व्हिडीओ शेअर करत जान्हवी किल्लेकर म्हणाली, "आज मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. आज आपल्या महाराष्ट्रात असेन अनेक कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांना बिग-बॉसच्या घरात जायचं आहे. असे अनेक लोक आहेत जे बिग बॉसमध्ये एकदा जाण्यासाठी धडपडतायत, रडतायत. कारण बिग बॉस हे इतकं मोठं नाव आहे त्यासाठी लोक कोणत्याही लेवलला येऊ शकतात. कारण बिग बॉस हा अत्यंत मोठा शो आहे. तिथे जाण्याचं स्वप्न महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती बघत असतो."
advertisement
( Bigg Boss Marathi 6 च्या घरात आणखी एक Wild Card Entry, कोण आहे नवा सदस्य? )
"ज्यावेळेस एवढ्या मोठ्या शोमध्ये तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचं असतं. ते सोडून तुम्ही आतमध्ये माती खाता आणि बाहेर येता. ठिक आहे पण ज्या शोने तुम्हाला ओळख दिली. ज्या शोने तुमचं नाव संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणलं त्या शोला नावं तरी ठेऊ नका. बिग बॉस बायस्ट आहे. स्पेशल रितेश देशमुख. रितेश सरांच्या बाबतीत तर प्लिज...कोणी काही बोलायचंच नाही कारण तो अत्यंच चांगला व्यक्ती आहे."
जान्हवी पुढे म्हणाली, "तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल मी कोणाबद्दल बोलतेय. बिग बॉसचा एक्स कंटेस्टंट जो नुकताच घराबाहेर आला आहे. मी बोलतेय रुचिताबद्दल. ती जे काही बिग बॉसच्या विरुद्ध बोलतेय ते अत्यंत चुकीचं आहे. कोण आहेस तू? कोण होतीस तू... तुला बिग बॉसच्या मेकर्सनी, क्रिएटर्सनी तुला एक संधी दिली. स्वत:ला सिद्ध करू दाखव. घरात चुका होतात, राग येतो, खूप काही होतं. मान्य आहे. मी सुद्धा त्या सगळ्या चुका केलेल्या आहेत. मी कोणालाही जज करत नाही. ज्या शोने तुम्हाला ओळख दिली त्यांच्याविरोधात बोलू नका. तुम्ही तुमच्या स्पर्धकांबद्दल बोला. तुम्ही बिग बॉसला बोलू नका आणि रितेश सरांना नाहीच नाही."
"बिग बॉसने तुला चुकीचं दाखवलं. तुला चुकीचं दाखवून त्यांना काय मिळणार आहे. जे तू आतमध्ये करणार ते बाहेर दाखवणार. यावर बोललं तर मला माझ्या कम्पेंटची लिस्टच लिहायला पाहिजे. सगळ्यात जास्त ओरडा खाणारी मी होते, मला विकेंडला बोलू दिलं नाही, पण मी बिग बॉसला कधीच नावं ठेवली नाहीत. रितेश सरांना बोलले नाही कारण ते शोचे होस्ट आहेत. इतका मोठा व्यक्ती आपल्याशी बोलतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे. बिग बॉसने आपल्याला निवडलं यापेक्षा मोठं काय आहे एक कलाकार म्हणून. ज्यात ताटात तुम्ही खाताय तिथेच तुम्ही भोक पाडताय."
"माझ्यासाठी बिग बॉस हा शो, देवासारखा आहे. मी आधीही मालिका केल्या होत्या पण बिग बॉसमुळे मला ओळख मिळाली. आज मी हिंदी रिअॅलिटी शो करून आले. हा शो फक्त मला बिग बॉसमुळे मिळाला आहे. या सो कॉल्ड स्पर्धकांना मी हेच सांगेन की, तुम्ही बोला. पण बिग बॉसच्या विरोधात बोललात तर हे मी खपवून घेणार नाही आणि रितेश सरांच्या विरोधाबद्दल बोलाल तर नाहीच नाही", असंही जान्हवी म्हणाली.
