वर्सोवा पोलिसांनी मंगळवारी (28 जानेवारी) अभिनेता कमाल आर खानला जारी केलेला शस्त्र परवाना रद्द करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात कागदपत्रे सादर केली आहेत. अभिनेत्याला अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या जामिनाच्या केआरकेला 25,000 रुपयांचा जातमुचलका सादर करावा लागणार असल्याची माहिती आहे. 28 जानेवारी रोजी न्यायालयाने केआरकेचा जामीन अर्ज फेटाळला होता. हा खटला हाय- प्रोफाइल असल्याने, मुंबई पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. पोलीस कोठडी संपल्यानंतर अभिनेत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात येणार होती. परंतू चौकशी दरम्यान केआरकेने त्याच्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचे कबूल केले. तथापि, केआरके आणि त्याच्या वकिलांनी हे नाकारले.
advertisement
अभिनेत्याने त्याच्या जबाबात कबूल केले की, केआरकेने 18 जानेवारी रोजी ओशिवरा परिसरातील नालंदा सोसायटीमध्ये त्याच्या परवानाधारक शस्त्रातून दोन गोळ्या झाडल्या. तपासादरम्यान, पोलिसांना सोसायटी कॅम्पसमध्ये दोन गोळ्या सापडल्या, एक दुसऱ्या मजल्यावर आणि दुसरी चौथ्या मजल्यावर, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. केआरकेची वकिल सना रईस खान यांनी युक्तिवाद केला की, केआरकेला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. नागरी सुरक्षा संहितेचा हवाला देत, वकिलाने सांगितले की केआरकेला अटक विना नोटीसच करण्यात आली होती, जी बेकायदेशीर आहे. शिवाय, तिने असे म्हटले की, केआरकेला अटक का करण्यात आली याबद्दल कोणतीही विशिष्ट माहिती देण्यात आली नव्हती.
ओशिवरातील ‘नालंदा’ इमारतीमध्ये गोळीबाराची घटना घडली. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे, केआरकेला पोलिसांनी पोलिस कोठडी सुनावली होती. या घटनेनंतर, वांद्रे न्यायालयाने सुरुवातीला त्याला 27 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत स्थालांतरित करण्यात आले. केआरकेच्या वकिलाने या प्रकरणाला बनावट कट रचल्याचे म्हटले. आपल्या युक्तिवादात, वकिलाने असे म्हटले आहे की केआरकेचा गोळीबार करणाऱ्या आरोपीशी कोणताही संबंध नाही. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की ज्या दोन फ्लॅटमध्ये गोळ्यांचे निशाण आढळले आहेत ते सुमारे 400 मीटर अंतरावर आहेत, तर वापरलेल्या शस्त्राची रेंज फक्त 20 मीटर असल्याचे सांगण्यात आले आहे.
