अभिनेत्री जया बच्चन यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या एका चाहत्याला धक्का देताना आणि त्याच्यावर रागावताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतने जोरदार टीका केली आहे, ज्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
जया बच्चन यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात एका व्यक्तीला जोरदार फटकारलं आणि त्याला धक्का देऊन बाजूला केलं. ती व्यक्ती त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंगना रणौतने जया बच्चन यांना 'बिघडलेली महिला' म्हटलं आहे.
advertisement
जया बच्चन यांच्या वागण्यावरून कंगना राणौत काय म्हणाली?
कंगना राणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवरून या घटनेवर आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, "जया बच्चन यांना लोक फक्त यासाठी सहन करतात, कारण त्या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत. त्यांचं हे वागणं पूर्णपणे चुकीचं आहे."
व्हिडिओमध्ये जया बच्चन रागात त्या व्यक्तीला 'काय करत आहेस तू? हे काय आहे?' असं म्हणताना दिसत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सेलिब्रिटींनी त्यांच्या चाहत्यांसोबत अशाप्रकारे वागू नये, असंही काही लोक म्हणत आहेत. कंगना रणौतने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जया बच्चन या अभिनेत्री आहेत, पण त्या एक लोकप्रतिनिधीही आहेत. अशा व्यक्तीने लोकांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे.