'माझा काहीही संबंध नाही, परवानगी न घेता...', के. के मेनन काँग्रेसवर संतापला, थेट 'त्या' VIDEO वर केली कमेंट

Last Updated:

Congress Vote Theft Campaign : काँग्रेसने 'वोट चोरी'विरोधात मोहीम सुरू केली, परंतु के. के. मेननच्या व्हिडिओ वापरामुळे वाद निर्माण झाला आहे.

News18
News18
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील कथित 'वोट चोरी'च्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी एक लाख मतांची चोरी केवळ एकाच मतदारसंघात झाल्याचा दावा केला आहे. या आरोपांवरून काँग्रेसने 'वोट चोरी'विरोधात एक मोहीम सुरू केली आहे. पण याच मोहिमेसाठी वापरल्या गेलेल्या एका व्हिडिओमुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

'ही क्लिप माझ्या परवानगीशिवाय वापरली!'

काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात 'स्पेशल ऑप्स' या गाजलेल्या वेब सीरिजमधील 'हिम्मत सिंग'ची भूमिका साकारणारा अभिनेता के. के. मेनन दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय, "थांबा... स्क्रोल करणं थांबवा. जर तुम्ही ही रील पाहत असाल, तर त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे?" यानंतर व्हिडिओमध्ये 'वोट चोरी'विरुद्धच्या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
advertisement
पण, के. के. मेननने या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने स्पष्टपणे सांगितलं आहे की, 'मी या मोहिमेचा भाग नाही. माझ्या 'स्पेशल ऑप्स' या वेब सीरिजची एक प्रमोशनल क्लिप एडिट करून माझ्या परवानगीशिवाय वापरली गेली आहे.' मेननच्या म्हणण्यानुसार, हा व्हिडिओ वापरण्यापूर्वी काँग्रेसने त्याची परवानगी घेतली नव्हती.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Congress (@incindia)



advertisement

काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही 'हिम्मत सिंग काहीतरी बोलत आहेत, ते लगेच अंमलात आणा' असं लिहिलं होतं, ज्यामुळे लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं होतं. व्हिडिओमध्ये 'स्पेशल ऑप्स'च्या दुसऱ्या सिझनचं थीम साँगही वापरलं होतं. के. के. मेननने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे आता काँग्रेसच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अनेक नेटकऱ्यांनी मेननच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे आणि काँग्रेसवर टीका केली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझा काहीही संबंध नाही, परवानगी न घेता...', के. के मेनन काँग्रेसवर संतापला, थेट 'त्या' VIDEO वर केली कमेंट
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement