डॉक्टर पती-पत्नी सोबत 17 दिवस घरात सुरू होता भीषण प्रकार; पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली; भारतातील सर्वात मोठी घटना

Last Updated:

Biggest Digital Arrest Fraud: तब्बल 17 दिवस मानसिक दबावाखाली ठेवत दक्षिण दिल्लीतील निवृत्त डॉक्टर दांपत्याला सायबर ठगांनी ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये अडकवले आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली.

News18
News18
नवी दिल्ली: दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात राहणाऱ्या एका सेवानिवृत्त डॉक्टर दांपत्याला सायबर गुन्हेगारांनी तब्बल 17 दिवस ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून सुमारे 15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांच्या मते, एका कुटुंबाकडून डिजिटल अरेस्टद्वारे इतक्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याचा ही आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण मानले जात आहे.
advertisement
हे दांपत्य 2016 मध्ये अमेरिकेतून भारतात परतले होते आणि सध्या ग्रेटर कैलाशमध्ये राहतात. त्यांची मुले परदेशात राहतात. 24 डिसेंबर 2025 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत सायबर ठगांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या दांपत्याला मानसिक दबावाखाली ठेवले.
गुन्हेगारांनी स्वतःला TRAI चे अधिकारी आणि मुंबई पोलिसांचे जवान असल्याचे भासवून संपर्क साधला. मनी लॉन्ड्रिंग, करचोरी आणि गंभीर आर्थिक गुन्ह्यांचे खोटे आरोप करत दांपत्याला पूर्णपणे एकाकी करण्यात आले. तुमच्या बँक खात्यांत बेकायदेशीर पैसा आहे. तो तात्काळ सरकारी सुरक्षित खात्यांत जमा केला नाही तर अटक होईल, अशी धमकी देत किमान 14.85 कोटी रुपये विविध खात्यांत ट्रान्सफर करून घेतले.
advertisement
या काळात ठगांनी व्हिडीओ कॉलद्वारे सतत नजर ठेवली होती. घराबाहेर न जाणे, कोणाशीही संपर्क न साधणे, फोन बंद न करणे अशा सक्त सूचना दिल्या जात होत्या.
पैसे संपताच उघडकीस आले प्रकरण
9 जानेवारीला दांपत्याकडे आणखी पैसे उरले नाहीत, तेव्हा ठगांनी “जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन जप्त रक्कम सोडवण्यासाठी आदेश घ्या,” असे सांगितले. याच क्षणी आपली फसवणूक झाल्याची जाणीव दांपत्याला झाली.
advertisement
10 जानेवारी रोजी त्यांनी 1930 सायबर क्राइम हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. सुरुवातीला स्थानिक पोलिसांनी प्रकरण हाताळले, मात्र रकमेचा मोठा आकडा पाहता तपास दिल्ली पोलिसांच्या IFSO (Intelligence Fusion and Strategic Operations) युनिटकडे वर्ग करण्यात आला.
IFSO कडून तपास, आंतरराष्ट्रीय टोळीचा संशय
advertisement
IFSO युनिटने गुन्हा दाखल केला असून पीडित दांपत्याची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक तपासात फसवणुकीची रक्कम आधी 5-6 प्राथमिक खात्यांत जमा करून नंतर ती अनेक खात्यांत व डिजिटल वॉलेट्समध्ये झपाट्याने वळवण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस सध्या मनी ट्रेलचा माग काढत आहेत, मात्र आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा सहभाग असल्याने संपूर्ण रक्कम परत मिळवणे कठीण मानले जात आहे.
advertisement
‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट ही सायबर ठगांची मानसिक दडपशाहीवर आधारित फसवणूक पद्धत आहे. यात सीबीआय, ईडी, पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून पीडितांना घरातच कैद केल्यासारखी परिस्थिती निर्माण केली जाते. व्हिडीओ कॉलवरून सतत नियंत्रण ठेवत, भीती दाखवून सर्व पैसे “सुरक्षित सरकारी खात्यात” ट्रान्सफर करण्यास भाग पाडले जाते.
advertisement
दिल्लीमध्येच गेल्या महिन्यात 85 वर्षीय महिलेची महिनाभर डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून 1.3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकारही समोर आला होता, असे पोलिसांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/मनी/
डॉक्टर पती-पत्नी सोबत 17 दिवस घरात सुरू होता भीषण प्रकार; पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली; भारतातील सर्वात मोठी घटना
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement