TRENDING:

'संजय कपूरचं तिला काहीही नकोय', करिष्माच्या वकिलांनी सांगितलं; मग कोर्टात का गेली?

Last Updated:

Karisma Kapoor : करिष्मा कपूरला एक्स नवरा संजय कपूरच्या संपत्तीतील काहीच नकोय असं तिच्या वडिलांनी कोर्टात सांगितलं आहे. मग करिष्मा कोर्टात का गेली होती?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री करिष्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूरचं काही दिवसांआधी निधन झालं. बिझनेसमन असलेल्या संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी करिष्मा कपूरची दोन्ही मुलं कोर्टात पोहोचली. पण संजयची तिसरी पत्नी प्रिया सचदेव हिनं संजयच्या मृत्यूपत्रात मुलांचा हिस्साच नसल्याचं सांगितलं आणि यावरून चांगलाच वाद निर्माण झाला. तिने करिष्मा कपूरवर देखील आरोप केले. दरम्यान  वकिलांनी करिष्माची बाजू मांडली आहे.
News18
News18
advertisement

अभिनेत्री करिश्मा कपूरच्या वकिलाने सांगितले आहे की, ती स्वतःसाठी दिवंगत उद्योगपती संजय कपूरच्या संपत्तीतून काहीही मागत नाही. ही कायदेशीर लढाई फक्त तिच्या कियान आणि समायरा या दोन मुलांसाठी आणि यांच्या योग्य वारशासाठी आहे.

( 13 वर्षांचा संसार, पदरात 2 मुलं, करोडोंची संपत्ती; सगळं काही आलबेल तरी का झाला करिष्मा-संजयचा डिवोर्स )

advertisement

वकिलांचा मोठा दावा

करिश्मा आणि तिच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी प्रिया सचदेव हिचा दावा फेटाळला. प्रियाने सांगितलं होतं की, मुलांना 1900 कोटी रुपये मिळतील. मात्र जेठमलानी म्हणाले, "जर संपूर्ण इस्टेट 30,000 कोटी रुपये असेल आणि मुलांना फक्त 1900 कोटी रुपये मिळत असतील तर हे योग्य नाही. ते फाइव्ह क्लास वन वारस उत्तराधिकारी आहे. म्हणजेच आई, 3 मुले आणि प्रिया. मग खरं वील म्हणजेच इच्छापत्र का उघड केली जात नाही? मुलांना जे मिळायला हवे ते मिळालेले नाही. ही संजय कपूरची मालमत्ता आहे. कोणीही उपकार करत नाहीये."

advertisement

प्रिया सचदेववर आरोप

प्रियाच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, कियान आणि समायरा यांना मृत्युपत्रातून वगळ्यात आलेलं नाही. त्यांना 1900 कोटी मिळणार आहेत. मात्र करिश्माच्या कायदेशीर पथकाने सांगितले की, प्रियाने इस्टेटवर नियंत्रण घेतल्यामुळे मुलांना प्रत्यक्षात पैशांवर अधिकार नाही.

वकिलांनी मांडली करिष्माची बाजू

जेठमलानी पुढे म्हणाले, "करिश्मा कपूरला स्वतःसाठी काहीही नकोय. या खटल्याचा उद्देश फक्त तिच्या मुलांना त्यांच्या दिवंगत वडिलांनी सुरक्षित ठेवावं असा हेतू होता आणि तोच पूर्ण करणे आहे. यासाठी ट्रस्ट डीड आणि एक मृत्युपत्र होतं. पण हे मृत्युपत्र कधीही उघड केले गेले नाही, ते नोंदणीकृतही नाही."

advertisement

कोर्टाची पुढील सुनावणी

करिश्माच्या मुलांसह, संजयची आई राणी कपूर यांनीही प्रियाविरोधात खटला दाखल केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने प्रियाला तिच्या दिवंगत पतीच्या सर्व मालमत्ता उघड करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 9 ऑक्टोबरला होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'संजय कपूरचं तिला काहीही नकोय', करिष्माच्या वकिलांनी सांगितलं; मग कोर्टात का गेली?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल