TRENDING:

KBC16 : बिग बींमुळे पूर्ण झाली महाराष्ट्रातील शेतकऱ्याची इच्छा, 25 वर्षांनी बायकोला पैठणी साडी घेऊन देणार

Last Updated:

KBCच्या मंचावर हॉटसीटवर बसलेल्या एका शेतकरी स्पर्धकाला खेळात प्रोत्साहन देत त्याची इच्छा पूर्ण करण्याची संधी अमिताभ बच्चन यांना मिळाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध टेलिव्हिजन शो म्हणजे कोन बनेगा करोडपती. या शोचा आता सोळावा सीझन सुरू आहे. अमिताभ बच्चन आजही त्याचं उत्साहात हा शो होस्ट करताना दिसतात. हॉटसीटवर बसणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाशी ते त्याच उत्साहात गप्पा मारतात. त्यांच्याकडून अनेक गोष्टी ऐकतात. आपल्याबद्दल अनेक गोष्टी शेअर करतात. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याची इच्छा पूर्ण केली आहे. हॉटसीटवर बसलेल्या एका शेतकरी स्पर्धकाला खेळात प्रोत्साहन देत त्याची इच्छा पूर्ण करण्याची संधी अमिताभ बच्चन यांना मिळाली.
अमिताभ बच्चन केबीसी 16
अमिताभ बच्चन केबीसी 16
advertisement

कोन बनेगा करोडपतीच्या गणपती विशेष भागात महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील 50 वर्षांचे शेतकरी मुकुंद नारायण मोरे हे शोमध्ये सहभागी होणार आहेत. मुकुंद हे अनेक वर्ष शेतकरी म्हणून काम करत आहेत. त्यांना आधुनिक शेती करण्याची इच्छा आहे. हॉटसीटवर बसल्यानंतर मुकुंद यांनी अमिताभ बच्चन यांना एक वस्तू देऊन त्यांचे आभार मानले. त्यांच्या शेतातील उत्पन्नाची पहिली पोटली ते बिग बींना देतात.

advertisement

( Suspense Thriller Movie: 2024 चा सुपरहिट सिनेमा, सस्पेन्स असा की डोकं चक्रावेल; बॉक्स ऑफिसवर दणकून केली कमाई! )

मुकुंद अमिताभ यांना म्हणतात, आम्ही शेतकरी आहोत आणि आमच्या शेतात आलेलं पहिलं पीक आम्ही देवाला अर्पण करतो आणि तुम्ही आमच्यासाठी देवसमान आहात. यावर भावुक होत अमिताभ बच्चन म्हणतात, किती गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळतात. शेतकरी साधा माणूस असतो पण त्याचं हृदय खूप मोठं असतं.

advertisement

पुढे बोलताना मुकुंद यांनी गायक कुमार सानू त्यांना खूप आवडतात असं सांगतात. त्यांनी सांगितलं, मी शेतात काम करताना कुमार सानू यांची गाणी ऐकतो. कुमार सानू यांच्याविषयी प्रेम पाहून अमिताभ बच्चन कुमार सानू यांना व्हिडीओ कॉल करतात आणि मुकुंद यांना सरप्राइज देतात.

कुमार सानू स्क्रिनवर येताच मुकुंद प्रचंड खूश होतात. कुमार सानू म्हणतात, तुमचं अन्न खाऊन आम्ही जगत आहोत, गाणी गात आहोत. तुम्ही खूप महान काम करत आहात आणि मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही माझे फॅन आहात. त्यानंतर कुमार सानू मुकुंद यांच्यासाठी सोचेंगे तुम्हे प्यार... हे गाणं देखील गातात.

advertisement

मुकुंद हे 1,60,000 रुपयांच्या प्रश्नासाठी ऑडियन्स पोलचा उपयोग करतात आणि योग्य उत्तर देतात. त्यानंतर 3,20,000 रुपयांच्या प्रश्नासाठीही लाइफलाइन वापरुन योग्य उत्तर देतात. त्यानंतर बिग बी त्यांना म्हणतात, तुम्ही खूप विद्वान आहात. तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्याकडे खूप ज्ञान आहे. तुमची पत्नी देखील तिथे खूप आनंदी आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हॉटेलमध्ये महाग मिळणारं इटालियन डेझर्ट फक्त 50 रुपयांपासून, मुंबई हे आहे लोकेशन
सर्व पहा

त्यावर शेतकरी मुकुंद म्हणतात, "मी ही रक्कम माझ्या पत्नीला देईन. तिला पैठणी साडी घेईन. 25 वर्षात मी तिच्यासाठी एकही भेटवस्तू घेतलेली नाही. म्हणून एक साडी गिफ्ट आणि यात्रेला जाण्याचा प्लान केला आहे".

मराठी बातम्या/मनोरंजन/
KBC16 : बिग बींमुळे पूर्ण झाली महाराष्ट्रातील शेतकऱ्याची इच्छा, 25 वर्षांनी बायकोला पैठणी साडी घेऊन देणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल