TRENDING:

एका बाईच्या मागे दुसरी बाई का उभी राहू शकत नाही! 'अगं अगं सूनबाई...' चा ट्रेलर, VIDEO

Last Updated:

केदार शिंदे दिग्दर्शित अगं अगं सूनबाई काय म्हणताय सासूबाई या सिनेमात प्रार्थना बेहेरे व निर्मिती सावंत मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बाईपण भारी देवा नंतर दिग्दर्शक केदार शिंदे यांचा 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. सिनेमात अभिनेत्री निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत आहेत. पुन्हा एकदा स्त्रीयांच्या भावना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
News18
News18
advertisement

महिला पत्रकारांच्या हस्ते केले ट्रेलरचे अनावरण! अभिनेत्री प्रार्थना बेहेरेच्या बर्थडे निमित्तानं या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. महिला पत्रकारांच्या हस्ते ट्रेलर रिलीज करण्यात आला.  सासू सुनेचं नातं हे अनेक कुटुंबात तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना या प्रकारचं असतं.. तर काहींसाठी ‘ असून अडचण, नसून खोळंबा’ अशा स्वरूपाचं असतं. अशाच काहीशा भावना मांडणारा आणि या नात्याचे नवे पैलू सिनेमातून उलगडण्यात येणार आहेत.

advertisement

( Punha Sade Made Teen मधून अमृता खानविलकरचा पत्ता कट? 'कुरळे ब्रदर्स'च्या गँगमध्ये रिंकूची एन्ट्री, VIDEO )

स्त्रियांनी एकमेकींना समजून, एकमेकींची साथ दिल्यावर त्या अधिक सक्षम व मजबूत होतील असा प्रभावी विचार या सिनेमातून मांडण्यात आला आहे. प्रार्थना बेहेरे आणि निर्मिती सावंत यांची धम्माल ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. कधी भांडण, रूसवे-फुगवे तर कधी एकमेकींना खंबीर साथ देताना दिसत आहेत.

advertisement

सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? हा एक मनोरंजक व कौटुंबिक सिनेमा आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, त्यामुळे हा सिनेमा घरातील प्रत्येकासाठी आहे. यात विनोद आहे, भावना आहेत आणि प्रत्येक घरात दिसणाऱ्या सासू-सुनेच्या नात्याची ओळखीची परिस्थिती आहे. प्रेक्षकांना या नात्यातील गंमतीदार प्रसंग, भावनिक वळणे आणि दोन्ही व्यक्तिरेखांची ताकद अनुभवता येईल."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहान मुलांसाठी क्युट बॅग्स, 100 रुपयांत करा खरेदी,मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
सर्व पहा

अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई? या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केल आहे. तर सना शिंदे, उमेश कुमार बन्सल सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाची कथा आणि संवाद वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. हा सिनेमा येत्या 16 जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
एका बाईच्या मागे दुसरी बाई का उभी राहू शकत नाही! 'अगं अगं सूनबाई...' चा ट्रेलर, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल