समोर आलेल्या पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे. आता सासू-सूनेच्या भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रत्येक घरात,कुटुंबात घडणारी सासू-सुनेच्या नात्याची मजेशीर केमिस्ट्री, हलकीशी चतुराई, जिव्हाळा आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड-तिखट चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे.
advertisement
नव्या सिनेमाविषयी बोलताना केदार शिंदे म्हणाले, "प्रत्येक घरात सासू-सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं, दोन विचार आणि दोन घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य या सिनेमात पाहायला मिळेल. तसेच हा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे, कारण या सिनेमाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."
झी स्टुडिओज व सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाची निर्मिती सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. सिनेमाची स्टोरी आणि डायलॉग वैशाली नाईक व ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण व संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा सिनेमा पुढील वर्षी म्हणजेच 16 जानेवारी 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
या आधी केदार शिंदे यांचा झापुक झुपूक हा सिनेमा रिलीज झाला होता. रीलस्टार आणि बिग बॉस सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाणबरोबर त्यांनी हा सिनेमा केला होता. पण या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
