आपण ज्या गायकाविषयी बोलत आहोत तो गायक म्हणजे किशोर कुमार. 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार आधीच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता होते. त्यांच्या प्रभावाखाली किशोर कुमारही मुंबईत आले आणि सिनेमात करियर करण्यास सुरुवात केली.
advertisement
किशोर दांनी शिकारी या सिनेमातून अभिनेता म्हणून कामाला सुरुवात केली. पण त्यांची ओढ ही गाण्यांकडे होती. 'जिद्दी' (1948) चित्रपटात मरने की दुआएं क्यों मांगू हे त्यांनी गायलेलं पहिलं गाणं होतं. त्यानंतर त्यांना मागे वळून पाहायला लागलं नाही.
किशोर कुमार हे प्रतिभावान गायक होतेच. त्यांच्या गाण्याचं करिअर नेहमीच पिकवर राहिलं पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत राहिलं. त्यांनी चार लग्न केली. त्यांचं पहिलं लग्न रूमा घोष यांच्याशी झालं. पण काही वर्षात ते तुटलं. त्यानंतर बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री मधुबाला त्यांच्या आयुष्यात आली. मधुबाला ही हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. मधुबालाची बरोबरी आजवर कोणीच करू शकलं नाही.
योगिता बाली ही किशोर कुमार यांची तिसरी पत्नी होती. तर लीना चंदावरकर ही किशोर कुमार यांची चौथी पत्नी. लीना चंदावरकर यांनी किशोर कुमार यांना शेवटपर्यंत साथ दिली. मधुबालासोबतचं त्यांचं लग्न विशेष चर्चेत राहिलं. दोघांचं प्रेम सिनेमासारखं गोड आणि दुःखदही होतं.
किशोर दांनी मेरे सपनों की रानी, पल पल दिल के पास, जिंदगी एक सफर है सुहाना, एक लड़की भीगी भागी सी अशी अनेक हिट गाण्यांनी चाहत्यांना वेड लागलं. 13 ऑक्टोबर 1987 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने किशोर कुमार यांचं निधन झालं. पण त्यांचा आवाज आजही प्रत्येक पिढीच्या मनात जिवंत आहे. त्यांची गाणी आजही रेडिओ, संगीत कार्यक्रम आणि सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.