TRENDING:

Diwali 2025 : दिवाळीत किल्ला बनवायचा? शिवरायांचे मावळे इथं करा खरेदी, किंमतही कमी

Last Updated:

दिवाळीच्या सणात सगळी मुलं एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने किल्ले बनवतात आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर मावळे यांच्या मूर्ती लावतात. या परंपरेतून मुलांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळीच्या सणात सगळी मुलं एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने किल्ले बनवतात आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शूर मावळे यांच्या मूर्ती लावतात. या परंपरेतून मुलांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि देशभक्तीची भावना निर्माण होते. या सुंदर परंपरेला अधिक आकर्षक रूप देण्यासाठी कांजूरमधील एकदंताय आर्ट्स या होम बुटीकमध्ये अत्यंत रेखीव आणि आकर्षक मूर्ती उपलब्ध आहेत.
advertisement

येथे 8 मावळ्यांचा सेट मिळतो ज्यात 4 मावळे गड चढणारे आहेत. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जिरेटोपांचाही खास संग्रह उपलब्ध आहे. या जिरेटोपांची किंमत 600 ते 750 दरम्यान आहे. रायगडावरील प्रसिद्ध मेगडंबरीचे मॉडेल 12, 6 आणि 4 इंच साईजमध्ये मिळते. विशेष म्हणजे 12 इंचाच्या मॉडेलमध्ये आकर्षक LED light दिलेली आहे. याची किंमत 750 पासून 6500 पर्यंत आहे.

advertisement

Diwali 2025 : नेहमीचा पॅटर्न सोडा, या दिवाळीत साडीपासून शिवा हटके ट्रेडिंग ड्रेस, खास टिप्सचा Video

महाराजांची राजेशाही मूर्ती 1500 पासून उपलब्ध आहे जी दिवाळीतील सजावटीसाठी तसेच गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय आहे. महालक्ष्मीची सुंदर रेखीव मूर्ती फक्त 750 मध्ये मिळते. याशिवाय राजमुद्रा बॅज देखील येथे उपलब्ध आहे. तो MDF मटेरिअलने बनवलेला असून याची किंमत 250 आहे. हा बॅज शर्टवर लावता येतो तसेच फ्रिज मॅग्नेट म्हणूनही वापरता येतो.

advertisement

एकदंताय आर्ट्समध्ये गणपती बाप्पाची फक्त 1 इंचाची आकर्षक मूर्तीही आहे ज्याची किंमत फक्त 150 आहे. तसेच शिवाजी महाराजांची अश्वरूढ मूर्तीही येथे मिळते. विविध प्रकारच्या फ्रेम्स उपलब्ध आहेत. राजमुद्रा फ्रेम, सुवर्ण होणं फ्रेम आणि ॲक्रेलिक फायबर फ्रेम्स. ग्राहकांना हवे असल्यास फ्रेम्स कस्टमाईज करून देण्याची सोय देखील आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बत्ताशे कसे तयार होतात, हे कधी पाहिलंय का? संजयचं फॅक्टरी, महिन्याला इतकी कमाई
सर्व पहा

या सर्व मूर्ती आणि सजावटीच्या वस्तू फायबर मटेरिअलच्या बनवल्या असल्याने त्या वॉशेबल आणि टिकाऊ आहेत. दिवाळी सजावटीसाठी, होम डेकोर आणि गिफ्टिंगसाठी या वस्तू उत्तम पर्याय आहेत. या वस्तू खरेदीसाठी तुम्ही एकदंताय आर्ट्स यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करून किंवा 9930088962 या क्रमांकावर कॉल करून ऑर्डर देऊ शकता. या दिवाळीत मुलांच्या हातांनी बनवलेल्या किल्ल्यांना पारंपरिक आणि राजेशाही स्पर्श देण्यासाठी या सुंदर मूर्ती नक्की घ्या.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Diwali 2025 : दिवाळीत किल्ला बनवायचा? शिवरायांचे मावळे इथं करा खरेदी, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल