बिग बॉस मराठी 6 ची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नवा सीझन सुरू होण्याआधी आधीच्या बिग बॉस स्पर्धकांची रि युनियन पार्टी पार पडली. अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची स्पर्धक स्मिता गोंदकर हिने ही पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला पहिल्या ते पाचव्या बिग बॉस मराठीचे सगळे स्पर्धक सहभागी झाले होते. सगळ्यांना पुन्हा एकत्र पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. अनेक कलाकार अनेक महिन्यांनी समोर आले.
advertisement
( 'मी महाराष्ट्राचा खरा 'धुरंधर'; निवडणुकीच्या धामधुमीत अभिजीत बिचुकले असं का म्हणाले? )
या पार्टीमध्ये बिग बॉस मराठीच्या दोन तगड्या एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे आणि वर्षा उसगावकर अनेक वर्षांनी एकत्र दिसल्या. वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे यांनी हिंदी गाण्यांवर धम्माल डान्सही केला. वर्षा आणि किशोरी ताई लकडी आँख मारे या गाण्यावर थिरकताना दिसल्या. त्यानंतर त्या तृप्ती भोईर यांच्याबरोबर बलम पिकचारी गाण्यावर नाचताना दिसल्या. दोघींना डान्स करताना पाहून स्मिता गोंदकर देखील पाहतच राहिली.
मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या दोन एव्हरग्रीन अभिनेत्रींना एकत्र पाहून चाहत्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला. अभिनेत्री किशोरी शहाणे या बिग बॉस मराठी 2 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. तर अभिनेत्री वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सहभागी झाल्या होत्या. दोघींनी बिग बॉसमध्ये खूप धम्माल केली होती. अनेकदा अपमानही सहन केला होता. मात्र त्यांच्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकली होती.
बिग बॉस मराठी 6 येत्या 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. अभिनेता रितेश देशमुख सीझन होस्ट करणार आहे. घरात कोणते कलाकार जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. लवकरच सगळ्यांची नावं समोर येतील.
