करण जोहरने दोघांनाही त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात कुठे झाली असा पहिला प्रश्न विचारला. याला उत्तर देताना रणवीर सिंहने मोठा खुलासा केला. त्याने दीपिका पदुकोण 'रामलीला' साठी पहिली पसंती नव्हती असं सांगितलं. बॉलिवूडची दुसरीच अभिनेत्री रणवीर सिंगसोबत लीलाच्या भूमिकेत झळकणार होती. रणवीरने या अभिनेत्रीचं नावही सांगितलं आहे. दीपिकाआधी 'रामलीला' हा चित्रपट करीना कपूरला ऑफर करण्यात आला होता.
advertisement
करिनाने आधी या भूमिकेसाठी होकार दिला पण या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वीच तिने चित्रपट करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत संजय लीला भन्साळी यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले. आता लीलाची भूमिका कोण करणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. दरम्यान, रणवीरने दीपिका पदुकोणचे नाव सुचवले. त्यादरम्यान दीपिकाचा 'कॉकटेल' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता आणि रणवीरला त्या चित्रपटातील दीपिकाचे काम आवडले होते. तेव्हा लीला ही भूमिका दीपिका पदुकोणला देण्यात आली आणि तिने या चित्रपटात नवीन नायिका म्हणून प्रवेश केला.
याविषयी बोलताना रणवीर सिंह म्हणाला, 'आम्ही बसून विचार करत होतो की कोणाला कास्ट करायचं. त्यानंतर 'कॉकटेल' रिलीज झाला. त्यामुळे मिस्टर भन्साळी, मी आणि सर्व सहाय्यक दिग्दर्शक ऑफिसमध्ये बसून चित्रपटात कोणाला कास्ट करायचे याबद्दल बोलत होतो. मी दीपिका पदुकोणचे नाव घेत होतो कारण मी 'कॉकटेल' पाहिला होता.' असा खुलासा त्याने केला आहे.
'गोलियों की रासलीला - राम लीला' 2013 मध्ये रिलीज झाला होता, आणि तो ब्लॉकबस्टर होता. या चित्रपटात रणवीर आणि दीपिकाची जोडी खूप आवडली होती. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या सेटवर रणवीर आणि दीपिकाची प्रेमकहाणी सुरू झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2015 मध्ये त्यांनी गुपचूप लग्न केले. नंतर रणवीर आणि दीपिकाने 'बाजीराव मस्तानी' आणि 83 सारख्या चित्रपटात एकत्र काम केले.