गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री क्रिती सेनन आणि यूकेमधील कोट्यधीश कबीर बहिया यांचं अफेअर सुरू असल्याची चर्चा आहे. दोघांनीही अजून त्याबाबत मौन बाळगलं असलं तरी क्रितीच्या यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनच्या फोटोंनी पुन्हा या चर्चेला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या दोघांचे सोशल मीडियावर एकत्र फोटो येत आहेत. वाढदिवसाचं सेलिब्रेशन असो, पार्टी असो अनेक ठिकाणी ते दोघं एकत्र दिसले. त्यामुळेच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.
advertisement
अभिनेत्री क्रिती सेनननं इंस्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. जवळची मित्रमंडळी व कुटुंबियांसोबत तिनं सेलिब्रेशन केलं. त्यातील एका फोटोत क्रितीसोबत कबीर बहियाही दिसतो आहे. त्यावरून दोघांनी दिवाळीचं सेलिब्रेशन एकत्र केल्याचं दिसत आहे. त्यावरून अभिनेत्रीनं त्या दोघांच्या नात्याला दुजोरा दिल्यासारखं चाहत्यांना वाटतंय.
Bigg Boss 18 मध्ये मोठा बदल, सलमान खान सोडणार शो? कोण करणार रिप्लेस?
क्रितीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये क्रितीसोबत पहिल्या फोटोत वडील राहुल, आई गीता आणि बहीण नुपूर सेनन दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत क्रितीसोबत नुपूर, तिचा बॉयफ्रेंड स्टेबिन बेन आणि कबीर बहिया आहे. क्रितीनं सेलिब्रेशनसाठी नेव्ही ब्लू आणि गोल्डन रंगाचा ड्रेस घातला आहे, तर कबीरनं इलेक्ट्रिक ब्लू रंगाचा कुर्ता व पॅन्ट घातली आहे. या फोटोमध्ये क्रितीचे हेअर आणि मेकअप आर्टिस्ट अॅड्रियन जेकब्स आणि आसिफ अहमद हेही दिसत आहेत. आणखी एका फोटोत ‘फुकरे’ चित्रपटातील अभिनेता वरुण शर्मा आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा दिसत आहेत.
क्रिती आणि कबीर यांच्या अफेअरबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. क्रितीनं यूपी टी-20 सीझन 2 च्या लाँचिंग कार्यक्रमातील एका परफॉर्मन्सचा बीटीएस व्हिडिओ शेअर केला होता, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. मात्र त्या दोघांनीही याबाबत काहीच प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. क्रितीचा एक लीगल थ्रिलर चित्रपट 25 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात क्रितीनं अभिनेत्री काजोलसोबत काम केलं आहे. क्रितीनं या चित्रपटात डबल रोल केला आहे.
सोशल मीडियावर क्रितीनं शेअर केलेल्या फोटोंमुळे सध्या तिच्या व कबीर बहियाच्या नात्याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर ते दोघं काय प्रतिक्रिया देतात याची चाहत्यांना उत्सुकता आहे.