Bigg Boss 18 मध्ये मोठा बदल, सलमान खान सोडणार शो? कोण करणार रिप्लेस?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan Bigg Boss 18: शोबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. यानुसार या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये चाहत्यांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
गेल्या महिनाभरापासून 'बिग बॉस 18' हा कार्यक्रम तुफान चालतोय. अनेक संकटं समोर असतानाही सलमान या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवघेण्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे सध्या भाईजानच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उभा राहिला असून त्याच्या सेक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर आणि त्याच्यावर धमक्यांचं सावट घोंगावत असल्यामुळे सलमान ‘बिग बॉस’चं शूटिंग थांबवणार अशा बातम्या पसरल्या होत्या. मात्र या सगळ्या अफवा फेटाळत सलमान ‘बिग बॉस’च्या ‘वीकेंड का वार’ला हजर राहिला. यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, या शोबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. यानुसार या आठवड्याच्या विकेंडच्या वारमध्ये चाहत्यांना मोठा बदल पाहायला मिळणार आहे. यावेळी सलमान खान एकटाच कार्यक्रमाचे होस्टिंग करणार नाहीय, तर बिग बॉसचा जुना स्पर्धक सलमानसोबत होस्टिंग करताना दिसेल. हा स्पर्धक आणखी कोणी नसून प्रसिद्ध भोजपूरी आणि बॉलिवूड अभिनेता रवि किशन आहे. रवि किशन हा बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा उपविजेता होता.
advertisement
रवि किशनला याआधी अनिल कपूरसह बिग बॉस OTT 3 चे होस्टिंग करताना चाहत्यांनी पाहिलं आहे. यावेळी त्याने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली होती. त्याने शिवानी कुमारीला तिच्या अपमानास्पद भाषेबद्दल फटकारले होते. तो तिला म्हणाला होता की, तुम्ही तुमच्या बोलीभाषेचा वापर करून कोणाचाही अपमान करू शकत नाही… तुम्ही लोकांना छेडता, हे चुकीचे आहे.
advertisement
Shahrukh Khan Birthday: किंग खानचा वाढदिवस, पण मन्नतबाहेर शुकशुकाट, यंदा असं काय घडलं?
या सीझनमध्ये सलमान खानने दिवाळी 2024 मुळे पहिल्यांदा 'फ्रायडे का वार' होस्ट केला. त्याने स्पर्धकांसोबत दीपोत्सव साजरा केला. या सगळ्या दरम्यान, सलमान शनिवार आणि रविवार ऐवजी शुक्रवार आणि शनिवारी शो होस्ट करणार आहे. सलमान खान आता शुक्रवार आणि शनिवारी 'फ्रायडे का वार' आणि 'शनिवार का वार' घेऊन येणार आहे. 'फ्रायडे का वार' एपिसोड दर शुक्रवारी रात्री १० वाजता प्रसारित होतील. तर, 'शनिवार का वार' भाग दर शनिवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित केला जाईल. रविवारी दररोज सारखा सामान्य भाग असेल.
advertisement
दरम्यान, निर्मात्यांच्या निर्णयामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर अभिनेत्याच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 02, 2024 7:25 PM IST