नवरात्री आणि नऊ रंग हा अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय आहे. दरवर्षी नऊ दिवस नऊ रंग फॉलो करण्याचा ट्रेंड आहे. नवरात्रीचा आणि नऊ रंगाचा काय संबंध आहे असाच प्रश्न कुशलला देखील पडला. त्यावर विचार केल्यानंतर कुशलला उत्तर सापडलं. त्याने व्हिडीओ शेअर करत ते उत्तर सर्वांबरोबर शेअर केलं आहे.
( 'एअरपोर्टवर आपली प्रार्थना का नाही' दुबई विमानतळावर 'अजान' ऐकून मंगेश देसाईचा प्रश्न, पोस्ट व्हायरल )
advertisement
कुशलने व्हिडीओमध्ये म्हटलंय, "नवरात्रीचा आणि नऊ रंगांचा काय संबंध? ह्या विचारात असताना मला अचानक ज्या गोष्टींचा साक्षात्कार झाला ना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसंच रंग बदलणाऱ्या सरड्यालासुद्धा असतो पण त्याला नवरात्र साजरी करता येत नाही."
कुशल पुढे म्हणाला, "होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो. तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो. 'रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा' या सुरेश भट्टांच्या गाण्यात ज्या रंगाविषयी बोललं जातंय, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे. त्यामुळे नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही".
कुशलने कृष्ण आणि रासलीलाचा संदर्भ देत म्हटलं, "यूपीमध्ये जन्माला आलेल्या कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते. महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही आणि माणूस म्हणून जगण्याची खरी रंगत येते हे या सणाचं मला वैशिष्ट्य वाटतं. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा"