'एअरपोर्टवर आपली प्रार्थना का नाही' दुबई विमानतळावर 'अजान' ऐकून मंगेश देसाईचा प्रश्न, पोस्ट व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Mangesh Desai Post : अभिनेता मंगेश देसाई नुकताच दुबईला गेला होता. दुबईहून परत येत असताना दुबई एअरपोर्टवर आलेला अनुभव त्याने सर्वांबरोबर शेअर केला आहे.
मुंबई : कलाकार मंडळी सोशल मीडियावर सक्रीय असतात. दररोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ते शेअर करत असतात. धर्मवीर फेम अभिनेता आणि निर्माता मंगेश देसाई यानं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. दुबईहून मुंबईला येताना एअरपोर्टवर आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेता मंगेश देसाई नुकताच दुबईला गेला होता. दुबईहून परत येत असताना दुबई एअरपोर्टवर त्याला अजाण ऐकू आली. त्याबद्दल त्याने पोस्ट लिहिली आहे. या गोष्टीचं त्यानं पोस्टमधून कौतुक देखील केलं आहे.
मंगेश देसाईनं पोस्ट लिहित म्हटलंय, "मी परवा दुबई एयरपोर्ट वरून मुंबईला येत होतो. चेकइन करत होतो आणि अचानक सुरेल आवाजात एयरपोर्टच्या आत 'अजाण' सुरू झाली आणि जाणवलं प्रत्येक धर्म आपलं अस्तित्व जपायचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून. आपल्या इथल्या एकाही एयरपोर्ट वर का नाही ऐकू येत एखादी प्रार्थना.?ते एक माध्यम आहे आपल अस्तित्व टिकवण्याचं."
advertisement
मंगेश देसाईनं पुढे लिहिलंय, "देवाने आपल्याला ज्यात्या धर्मात स्थान दिलेल असतं ती आपली निवड नसते. पण त्याचे आभार आपण त्याची आठवण करूनच मानू शकतो आणि ते आपले कर्तव्य आहे." पोस्टच्या शेवटी टिप लिहित मंगेश देसाईनं म्हटलंय, "कृपया याला जाती धर्म आणि राजकारणाचा रंग देऊ नये. जसे माझे कुटुंब आहे तसेच तुमचे ही आहे."
advertisement
मंगेश देसाईच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झाल्यास, तो अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात सक्रीय आहे. अभिनय क्षेत्रात नाव कमावत असताना त्याने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं. 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर 2' या सिनेमांची त्याने निर्मिती केली. अनेक मालिकांचीही निर्मिती केली आहे. मंगेश देसाई सध्या 'देऊळ बंद 2' या सिनेमाचं शूटींग करत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 10:15 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'एअरपोर्टवर आपली प्रार्थना का नाही' दुबई विमानतळावर 'अजान' ऐकून मंगेश देसाईचा प्रश्न, पोस्ट व्हायरल