TRENDING:

दुःखद बातमी: दिग्गज अभिनेत्रीचं निधन, 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Last Updated:

मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
मुंबई :मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. दिग्गज अभिनेत्रीचं निधन झालं आहे. अभिनेत्रीच्या अचानक जाण्याने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
दिग्गज अभिनेत्रीचं निधन
दिग्गज अभिनेत्रीचं निधन
advertisement

प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेत्री आशा शर्मा यांचं निधन झालंय. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्यानं अनेकांना धक्का बसलाय. कलासृष्टीने आज एक चांगला स्टार गमावला. टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन आशा शर्मा यांनी खूप मेहनतीनं कलासृष्टीत आपलं नाव बनवलं होतं. त्यांच्या अनेक भूमिका आजही लक्षात राहणाऱ्या आहेत.

advertisement

कपडे बदलण्यासाठी आणि बाथरुमला झाडामागे जावं लागायचं; अभिनेत्रीने सांगितलं ते स्ट्रगल!

13 व्या वर्षी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून आशा शर्मा यांनी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी 'दो दिशां' हा पहिला चित्रपट केला. त्यानंतर त्यांनी , 'हम तुम्हारे हैं सनम', 'मुझे कुछ कहना है' आणि 'आदिपुरुष' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 'कुमकुम भाग्य', 'मन की आवाज प्रतिज्ञा' आणि 'एक और महाभारत' यांसारख्या बऱ्याच टीव्ही मालिकांमध्येही भूमिका निभावल्या. 40 चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमध्ये आशा शर्मा यांनी आपली छाप सोडली.

advertisement

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

दरम्यान दीर्घ आजारपणामुळे त्या बेडवरच होत्या. आजारपणाशी झुंज देत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं मनोरंजनसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे चाहते, नातेवाईक, मित्र परिवार यांना धक्का बसला असून सर्वजण श्रद्धांजली अर्पन करत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
दुःखद बातमी: दिग्गज अभिनेत्रीचं निधन, 88 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल