'चोली के पीछे क्या है' वर माधुरी दीक्षितचा डान्स
उदयपुरमधील ग्रँड वेडिंगमध्ये समोर आलेल्या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित आपली 32 वर्षांपूर्वीची फिल्म 'खलनायक'मधील 'चोली के पीछे क्या है' या हिट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सोशल मीडियावर तो झपाट्याने व्हायरल होत असून फॅन्स धक-धक गर्लवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
advertisement
माधुरी थिरकली 'डोला रे डोला'वर
माधुरी दीक्षित 'देवदास' या चित्रपटातील 'डोला रे डोला' या आपल्या आयकॉनिक गाण्यावरही थिरकली आहे. माधुरीचा एनर्जेटिक परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. या दरम्यान तिने हिरव्या रंगाचा लेहेंगा आणि त्यासोबत गुलाबी दुपट्टा परिधान केला आहे. माधुरीला या गाण्यावर डान्स करताना पाहून चाहत्यांना ऐश्वर्या रायचीही आठवण झाली आहे. एका युजरने कमेंट केली,"छान आहे. पण ऐश्वर्या असती तर आणखी मजा आली असती". मूळ गाण्यात माधुरी आणि ऐश्वर्या दोघींनीही एकत्र डान्स केला होता.
उदयपुरमध्ये नेत्रा मंटेना आणि वामसी गड्डीराजू यांच्य लग्नाला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. करण जौहर आणि सोफी चौधरी यांनी हा इव्हेंट होस्ट केला. रणवीर सिंह, वरुण धवन, कृती सेनन आणि शाहिद कपूर हे कलाकार लग्नसोहळ्याचा भाग होण्यास उदयपुरला पोहोचले आहेत.
