TRENDING:

तुम्हाला पण माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक काय; समजून घ्या!

Last Updated:

Panchayat Raj Election: महाराष्ट्रात पंचायत राज निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत यामध्ये फरक आहे. याबाबत जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांनी राजकीय वातावणर चांगलंच तापलं आहे. पण आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडत असेल की नगरपरिषद आणि नगरपंचायतमध्ये नेमका काय फरक आहे? तर याविषयीच प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत कुरंगळ यांनी माहिती दिलीये.
advertisement

‎लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना खूप महत्त्व आहे. कारण नागरिकांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या त्या ठिकाणी जाऊन सोडवता येतात. भारतीय राज्यघटनेच्या 74 व्या घटनादुरुस्तीनुसार शहरी भागासाठी या संस्थांना दर्जा प्राप्त झालेला आहे.

ST Bus: विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ST बस लेट झाल्यास थेट फोन उचलायचा अन्...

नगरपंचायत म्हणजे काय?

नगरपंचायत ही मुख्यत्वे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्राकडे स्थापन होणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नगरपंचायतसाठी दहा हजार ते 25000 अशी लोकसंख्या असणे आवश्यक आहे. या क्षेत्रामध्ये ग्रामीण जीवनमान सुधारण्यासाठी शहरी सुविधा हळूहळू उपलब्ध करून देणे हे नगरपंचायतचे काम आहे. ज्या ठिकाणी 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या ही शेतीमध्ये गुंतलेले असते.

advertisement

नगरपंचायतीच्या जबाबदारीमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, रस्ते बांधणे, दिवाबत्तीची सोय, सांडपाण्याचे व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत सुविधा देण्याचं काम आहे. या संस्थेमध्ये राजकीय प्रमुख अध्यक्ष म्हणून ओळखला जातो तर प्रशासकीय प्रमुख कार्यकारी अधिकारी असतो.

नगर परिषद कुठं असते?

‎नगर परिषद किंवा नगरपालिका ही लहान आणि मध्यम आकाराच्या शहरी भागासाठी असते. ज्या शहराची लोकसंख्या 25000 पेक्षा जास्त पण एका लाखापेक्षा कमी असते या ठिकाणी नगर परिषदेची स्थापना केली जाते. नगरपरिषदेचे कार्य हे नगरपंचायती पेक्षा अधिक मोठे असते. त्यामध्ये पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते, शिक्षण, अग्निशामक सेवा, जन्ममृत्यू नोंदणी, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संरक्षण यांचा समावेश होतो.

advertisement

नगर परिषदेचे सदस्य नगरसेवक म्हणून ओळखले जाते. हे प्रौढ मतदान पद्धतीने थेट जनतेतून निवडून दिले जातात. नगर परिषदेचा राजकीय प्रमुख नगर अध्यक्ष असतो. प्रशासकीय प्रमुखा मुख्य कार्यकारी असतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्हाला माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक; समजून घ्या!
सर्व पहा

सध्या महाराष्ट्रात 225 नगरपालिका कार्यरत आहेत. नगरपालिकेला तीन विभागात वर्गिले गेले आहे त्यामध्ये अ, ब आणि क असे वर्ग असतात. यामध्ये एक लाखापेक्षा अधिक संख्या असलेली नगर परिषद असते. ब वर्गामध्ये 40 हजार ते एक लाख संख्या असलेली नगरपरिषद असते. तर क वर्गामध्ये 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेली नगरपरिषद असते. नगरपंचायत आणि नगरपरिषद यांमध्ये हाच प्रमुख फरक आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तुम्हाला पण माहितीये का? नगरपालिका आणि नगरपंचायत यांच्यातला नेमका फरक काय; समजून घ्या!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल