माधुरी दीक्षितच्या फिटनेसचं महत्त्वाचं कारण नृत्य आहे. नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण शरिराचा चांगला व्यायाम होतो, असं अभिनेत्रीचं मत आहे. त्यामुळे आठवड्यातील 4-5 दिवस व्यायाम करण्यावर अभिनेत्री भर देते. दररोज सकाळी मॉर्निंग वॉक करायलाही अभिनेत्री विसरत नाही. योग आणि कथ्थक करतानाचे व्हिडीओ माधुरी सोशल मीडियावर शेअर करत असते.
न्यूझिलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट कोहली-अनुष्का शर्माला हाकललं, क्रिकेटरने सांगितला 'तो' धक्कादायक प्रसंग
advertisement
व्यायामासह माधुरी दीक्षितचं आपल्या डाएटवरही तेवढंच लक्ष असतं. एकाचवेळी अती प्रमाणात खाणं माधुरी टाळते. तर दर दोन तासांनी म्हणजेच दिवसातून पाच वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात खाण्यावर अभिनेत्री भर देते. माधुरीच्या डाएटमध्ये ताज्या भाज्या आणि फळांचा प्रामुख्याने समावेश असतो. नारळ पाणी पिऊन अभिनेत्रीच्या दिवसाची सुरुवात होत असते. तर कधी-कधी हर्बल चहा प्यायला तिला आवडतो.
मीडिया रिपोर्टनुसार, माधुरीला जपानी डाएट, हल्का आहाराचा प्रकार आवडतो. मिक्स भाज्यांचा वापर करुन जपानी पद्धतीचं जेवण बनवायला तिला आवडतं. माधुरीच्या जेवणात अंड, नट्स, दही या यांचा समावेश असतोच. माधुरीच्या दुपारच्या जेवणात पाले भाज्या आणि भाकरीचा समावेश असतो.
'असा' आहे माधुरीचा दिवसभराचा आहार
माधुरी दीक्षितच्या एकंदरीत डाएटमध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असतो. अभिनेत्री सकाळी ओट्स आणि ताजी फळं खाते. तर दुपारच्या जेवणात दाळ, भाकरी, फळ भाज्या आणि सॅलड खाते. रात्रीच्या जेवणात प्रामुख्याने सूप आणि पालेभाज्या खाते. तसेच त्वचेवर तेज येण्यासाठी अभिनेत्री दिवसभर भरपूर पाणी पिते.
माधुरी दीक्षितने 'अबोध' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आजही अनेकांची ती 'धक धक गर्ल' आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या माधुरीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.