माधुरीच्या 'मिसेस देशपांडे'चा नवा एक नवा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात माधुरी डिग्लॅम अवतारात शांतपणे भाजी चिरताना दिसतेय. भाजी चिरताना ती 'भोली सी सुरत आँको में मस्ती' हे गाणं गुणगुणताना दिसतेय. तिच्या बाजूला रेडिओ ठेवलेला असून त्यावर एका सीरियल किलरची बातमी सुरू असते. ती बातमी एकूण माधुरी एक लुक देतो जो खूप काही सांगून जातोय. सीरिजच्या दुसऱ्या टीझरमध्येही सस्पेन्स आणि थ्रील पाहायला मिळतोय.
advertisement
( Mrs Deshpande नाही सीरियल किलर! कधी आणि कोणत्या OTT वर रिलीज होणार माधुरीची क्राइम-थ्रिलर सीरिज )
नागेश कुकुनूर यांनी या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. सस्पेन्स आणि थ्रिलर जॉनरच्या कलाकृतींमध्ये ही आणखी एक थरकाप उडवणारी सीरिज त्यांनी बनवली आहे. या सीरिजमध्ये माधुरी दीक्षित 'मिसेस देशपांडे' नाही तर एका सीरियल किलरची भूमिका साकारत आहे. 'मिसेस देशपांडे' या सीरिजमध्ये माधुरी दीक्षितबरोबर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि प्रियंशु चॅटर्जी हे महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
सीरिजबद्दल बोलताना दिग्दर्शक नागेश कुकनूर म्हणाले, "मिसेस देशपांडे माझ्यासाठी एक रोमांचक आणि अविस्मरणीय प्रवास आहे. स्क्रिप्ट लिहिताना या भूमिकेसाठी मला फक्त माधुरीच नजरेसमोर दिसत होती. तिचा डिग्लॅम लुक ही तर केवळ सुरुवात आहे.तिचं पात्र सतत प्रेक्षकांना तिच्या हसऱ्या चेहऱ्यामागे काय लपलंय याचा अंदाज लावत ठेवतं. हा रोल तिच्यासाठी पूर्णपणे वेगळा आहे आणि प्रेक्षक तिचा परफॉर्मन्स पाहून थक्क होतील हे नक्की."
आपल्या भुमिकेविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, "मिसेस देशपांडे माझ्यासाठी आतापर्यंतच्या सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे. हा रोल रॉ आहे, अनफिल्टर्ड आहे आणि लोक माझ्याकडून ज्या ग्लॅमरची अपेक्षा करतात त्यापासून पूर्णपणे दूर आहे वेगळा आहे. हे पात्र इतकं गुंतागुंतीचं आहे की तुम्हाला वाटतं तुम्ही तिला ओळखलंत पण पुढच्याच क्षणी ती बदलून जाते. इतक्या ग्रे शेड्स असलेलं पात्र साकारणं रोमांचकही होतं आणि तितकंच आव्हानात्मकही. माझा हे नवं आणि थ्रिलिंग रूप प्रेक्षकांनी नक्की पाहावं असं मला वाटतं."
'मिसेस देशपांडे' फ्रेंच सीरिजचा रिमेक
मिसेस देशपांडे ही सीरिज फ्रेंच थ्रिलर La Mante या सीरिजचा अधिकृत रिमेक आहे. याचे मूळ निर्माते हे Jean Nainchric आहेत. ही सीरिज 30 डिसेंबर 2017 रोजी रिलीज झाली होती. पॅरिसमध्ये पोलीस एका सायकोपॅथचा शोध घेत आहेत. हत्या करणाऱ्या व्यक्तीच्या हत्यांची पद्धत ही जीन डेबरसारखी आहे. 'द मँटिस' असं त्या हत्या पद्धतीचं नाव होतं. जीन डेबर ही कुप्रसिद्ध सीरियल किलर असते. जिने 25 वर्षांआधी संपूर्ण देश हादरवून सोडला होता. तिला अटक केल्यापासून तिला एकांतवासात ठेवण्यात आलं होतं.
जीन डेबरची पद्धत वापरून हत्या करणाऱ्या किलरला शोधण्यासाठी स्वत: जीन डेबरच पोलिसांना मदत करण्याची ऑफर देते. पोलिसांनी मदत करण्याआधी ती एक अट ठेवले. तिला हा तपास डिटेक्टिव्ह डॅमियन कैरो याच्याबरोबर करायचा आहे, डॅमियन हा तिचा दुरावलेला मुलगा आहे. पॅरिसमध्ये एक सीरियल किलर मुक्तपणे फिरत असताना आपलं काम करण्याशिवाय डॅमियनकडे पर्याय नसतो. अशी या सीरिजची स्टोरी आहे. La Mante चा रिमेक असलेली माधुरी दीक्षितची मिसेस देशपांडे ही सीरिज 19 डिसेंबर 2025 रोजी जिओहॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
