महाभारतात अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेते फिरोज खान यांनी पंकज धीर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. बुधवारी सकाळी 11.30 वाजता पंकज धीर यांचं निधन झालं. त्यांना कॅन्सर झाला होता. फिरोज खान यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पंकज धीर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिलंय, "जेन्टलमन, गुड बाय. तुझी खूप आठवण येईल पीडी."
advertisement
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर यांनी कॅन्सरशी दोन हात करत त्यावर मातही केली होती. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा एकदा त्याचा त्रास झाला आणि ते खूपच आजारी पडले. त्यांची तब्येत घालावली. त्यांच्या मोठी सर्जरी देखील करण्यात आली होती.
कशी मिळाली महाभारतात कर्णाची भूमिका?
पंकज धीर यांनी महाभारतात केलेली कर्णाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. पण खरं तर बी आर चोप्रा यांनी त्यांची निवड महाभारतात अर्जुनाच्या भूमिकेसाठी केली होती. सगळ्यांनी चोप्रा यांच्या कास्टिंगना होकार दिला होता. पंजक हे त्या भूमिकेसाठी परफेक्ट होते. त्यांनी निवड झाली, कॉन्ट्रक्टही साइन करण्यात आलं. त्यानंतर बी आर चोप्रा म्हणाले की, अर्जुनच्या भूमिकेबरोबर त्यांना बृहन्नला (अर्जुनचा नपुंसक अवतार) हाही अवतार साकारावा लागेल, ज्यासाठी मिश्या काढाव्या लागतील.
चोप्रा यांचं हे म्हणणं ऐकून पंकज धीर यांचा शॉक बसला त्यांनी सरळ नकार दिला. त्यांनी सांगितलं की त्यांचा चेहरा मिश्यांसहीतच रुबाबदार दिसतो. मिश्या काढल्या तर संपूर्ण लुक बदलून जाईल. त्यानंतर पंकज यांना काढून टाकण्यात आलं. काही दिवसांनी त्यांना कर्णाची भूमिका ऑफर करण्यात आली.