दीपा मेहता या नेहमीच आनंदी आणि मनमोकळं आयुष्य जगणाऱ्या होत्या. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्या स्वतःचा ‘क्वीन ऑफ हार्ट्स’ हा साड्यांचा ब्रँड चालवत होत्या. त्यांच्या लेकीने, अश्वमी मांजरेकरने, या ब्रँडसाठी अनेकदा मॉडेलिंग केलं आहे. दीपा यांच्या निधनामुळे त्यांच्या व्यवसायाला आणि ब्रँडला मोठं नुकसान झालं आहे.
धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
advertisement
महेश मांजरेकर आणि दीपा यांचं लग्न १९८७ मध्ये झालं होतं. कॉलेजपासूनच त्यांची ओळख होती. दोघांना सत्या आणि अश्वमी ही दोन मुलं झाली. पण संसार टिकला नाही. काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. नंतर महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न करून संसार थाटला आणि त्यांना सई मांजरेकर ही मुलगी झाली.
दरम्यान, दीपा या एकट्याच राहत होत्या. त्या आपलं काम, मित्रमंडळी आणि कुटुंब यांच्यात रममाण होत्या. त्यांच्या निधनाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दीपा मेहता निधन
मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत आईची आठवण काढली. त्याने एक जुना फोटो शेअर करून “मिस यू मम्मा” असं लिहिलं. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री शिल्पा तुळसकर आणि इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांनीही दीपा यांना आठवत पोस्ट शेअर केली.