धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. बालकलाकार आणि त्याच्या भावांचं निधन झालं आहे. शॉर्ट सक्रिट होऊन घरात गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. बालकलाकार आणि त्याच्या भावांचं निधन झालं आहे. शॉर्ट सक्रिट होऊन घरात गुदमरुन दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
कोटा शहरात शनिवारी रात्री उशिरा एक दुर्दैवी घटना घडली. दीपशिखा मल्टीफ्लॅटमध्ये आग लागल्याने दोन भाऊ वीर (10) आणि शौर्य शर्मा (15), यांचा मृत्यू झाला. आग सकाळी सुमारे 2:30 वाजता लागल्याचं समोर येतंय. तेव्हा त्यांचे पालकही घरात नव्हते. वडील जितेंद्र शर्मा भजनासाठी गेले होते, तर आई मुंबईत नातेवाईकांना भेट देण्यासाठी गेली होती.
advertisement
आगीची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि कुटुंबीय घटनास्थळी धावले. दोन्ही मुलांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. स्टेशन हाऊस ऑफिसर भूपेंद्र सिंह यांनी सांगितले की ही घटना बहु-कुटुंबीय फ्लॅटच्या चौथ्या मजल्यावर घडली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
मुलांचे मृतदेह सध्या मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून, पोस्टमॉर्टम नंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी दिले जाईल. पोलिस घटनास्थळाची सखोल पाहणी करत आहेत. ही घटना केवळ कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण परिसरासाठी धक्कादायक ठरली. वडील जितेंद्र शर्मा एका खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक आहेत, तर मुलांची आई रीटा शर्मा अभिनेत्री आहे. घटनेनंतर वडिलांनी दोन्ही मुलांचे डोळे दान केले, हे कुटुंबाच्या सहानुभूतीने भरलेल्या निर्णयाचे उदाहरण ठरले. मित्रमंडळी आणि नातेवाईक या घटनेमुळे शोकाकुल आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 1:27 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन मुलांचा गुदमरून मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव