Dashank yog: आज-आत्तापासून गोल्डन टाईम सुरू! दुर्मीळ दशांक योग जुळल्यानं 3 राशींकडे पैशांचा ओघ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dashank yog: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा धन, समृद्धी, आनंद, संपत्ती आणि सौंदर्याचा कारक मानला जातो. सध्या शुक्र सिंह राशीत आहे आणि 9 ऑक्टोबरपर्यंत तिथेच राहील. शुक्र अंदाजे दर 26 दिवसांनी आपली राशी बदलतो. ज्योतिषांच्या मते, सप्टेंबरच्या अखेरीस शुक्र एक अतिशय शक्तिशाली युती निर्माण करणार आहे.
शुक्र कुंडलीत मजबूत आणि शुभ असतो, तेव्हा व्यक्तीला सर्व प्रकारचे सांसारिक सुख, उत्तम वैवाहिक जीवन, कलांमध्ये रुची आणि आर्थिक समृद्धी मिळते. तसेच शुक्र कमजोर असल्यास व्यक्तीला भौतिक सुखांची कमतरता जाणवते. वैवाहिक जीवनात समस्या येतात, प्रेमसंबंधांमध्ये अपयश येते आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्वचेशी संबंधित किंवा लैंगिक आरोग्य समस्याही येऊ शकतात.
advertisement
advertisement
28 सप्टेंबर रोजी म्हणजे आज शुक्र ग्रह बुधासोबत युती करेल. या युतीमुळे एक शक्तिशाली दशांक योग निर्माण होईल. ज्योतिषांच्या मते, जेव्हा दोन ग्रह चक्रात ३६ अंशांच्या कोनीय स्थितीत येतात तेव्हा दशांक योग तयार होतो. या दुर्मीळ युतीचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल, परंतु काही राशींना विशेष फायदा होईल. जाणून घेऊ शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे कोणत्या राशींना दशांक योगाचा लाभ मिळेल.
advertisement
advertisement
कन्या - कन्या राशीच्या लोकांसाठी ही स्थिती अत्यंत शुभ आहे. बुध तुमचा स्वामी ग्रह असल्यानं तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा पगारवाढीचे संकेत मिळतील. हा काळ व्यावसायिकांसाठी देखील फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि सुसंवाद वाढेल आणि कुटुंबात शांतीचे वातावरण राहील.