काय! थप्पड मारल्याने चेहरा सुंदर होतो? एका अभिनेत्रीने शाहरूखलाही मारलं होतं

Last Updated:

Slap therapy benefits : थप्पड मारणं तसं चांगलं नाही. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की थप्पड मारण्याचे फायदे असल्याचे दावे केले जातात. थप्पड मारल्याने सौंदर्य वाढतं, चेहरा सुंदर होतो असं म्हणतात.

News18
News18
नवी दिल्ली : तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं असेल, असा एखादा सीन असतो ज्यात हिरोईन हिरोला थप्पड मारते. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानलाही एका अभिनेत्रीने ऑनस्क्रीन थप्पड मारली होती. थप्पड मारणं तसं चांगलं नाही. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की थप्पड मारण्याचे फायदे असल्याचे दावे केले जातात. थप्पड मारल्याने सौंदर्य वाढतं, चेहरा सुंदर होतो असं म्हणतात.
सौंदर्यासाठी थप्पडचा वापर ज्याला स्लॅप थेरेपी असं म्हणतात. स्लॅप थेरपी ही ब्युटी थेरपी मानली जाते.  कित्येक वर्षांपासून प्रचलित असलेली ही पद्धत.  दक्षिण कोरियातील महिला सौंदर्यासाठी या थेरपीचा अवलंब करतात. सुरुवातीला ही थेरपी केवळ कोरियामध्ये वापरल्याचं दिसलं. पण आता ती जगभर पसरली आहे.
advertisement
दक्षिण कोरियातील लोकांचा असा विश्वास आहे की थप्पड मारल्याने चेहऱ्याच्या प्रत्येक भागात रक्ताभिसरण वाढतं. चेहऱ्याचे स्नायू कडक होतात. त्वचा अधिक घट्ट होते आणि आकर्षक दिसते. यामुळे त्वचा स्वच्छ दिसते आणि चेहरा चमकू लागतो. अमेरिकन लोकांचा असा विश्वास आहे की थप्पड मारल्याने त्वचेचे ओपन पोर्स आकुंचन पावण्यास मदत होते. यासोबतच ते त्वचेला क्रीम ऑइल चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत करते. यामुळे त्वचा गुळगुळीत होते आणि सुरकुत्या कमी होतात.
advertisement
आता थप्पड मारणं म्हणजे गालावर रागात जोरात मारणं तसं नाही. तर दोन्ही हातांनी दोन्ही गाल मध्यम शक्तीने घासणं पुरेसं आहे. यासाठी लहानपणापासूनच त्याचा सराव केला जातो. या प्रक्रियेदरम्यान तुम्ही किती दाब देता याबद्दल काळजी घेणं आवश्यक आहे.
advertisement
(सूचना : हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जो फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. या लेखात करण्यात आलेल्या दाव्याची पुष्टी न्यूज18मराठीने केलेली नाही. याचं समर्थन करत नाही किंवा तसं करण्यास प्रोत्साहन देण्याचाही उद्देश नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
काय! थप्पड मारल्याने चेहरा सुंदर होतो? एका अभिनेत्रीने शाहरूखलाही मारलं होतं
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement