Thane Rain: ठाण्याच्या ग्रामीण भागात पावसाचं थैमान! पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Thane Rain: ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोळसत असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
ठाणे: मराठवाड्यात हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाने आपला मोर्चा मुंबई-ठाण्याकडे वळवला आहे. ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी (27 सप्टेंबर) रात्रीपासूनच जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने ठाणे जिल्ह्याला झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोळसत असून नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्याने भातसा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी भातसा धरणाचे 5 दरवाजे अडीच मीटरने उघडले आहेत. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे अनेक पुल पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटला आहे.
advertisement
शहापूर तालुक्यातील शहापूर-डोळखांब रस्त्यावरील भातसा नदीवरील पूल पाण्याखाली केला आहे. तालुक्यातील 70 टक्के गावं या पुलाच्या माध्यमातून शहराशी जोडली गेलेली आहेत. मात्र, आता पूलच पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. याशिवाय शहापूर- सापगाव-किन्हवली रस्त्यावरील पूल देखील पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून एकूण 40 गावांचा संपर्क तुटला आहे.
advertisement
दरम्यान, ठाणे शहराला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. ठाण्यात आतापर्यंत 115 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 28, 2025 2:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane Rain: ठाण्याच्या ग्रामीण भागात पावसाचं थैमान! पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला