Budh Gochar 2025: सिंह, वृषभ, तूळ राशींचे भाग्य उजळणार; दसऱ्यादिवशीचा बुध उदय पथ्यावर पडेल

Last Updated:
Budh Gochar 2025: यावर्षी दसरा गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. कॅलेंडरनुसार, दसरा किंवा विजयादशमी दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टिकोनातून दसऱ्याचा सण खूप खास मानला जातो. या दिवशी बुध कन्या राशीत उदय करणार असून लगेच दुसऱ्या दिवशी बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
1/5
बुधाचा उदय झाल्यावर संबंधित राशीच्या लोकांची बोलण्याची आणि व्यक्त होण्याची क्षमता सुधारते. गैरसमज दूर होऊन संवाद अधिक प्रभावी होतो. व्यापार, आर्थिक व्यवहार आणि शेअर मार्केटशी संबंधित कामांना गती मिळते आणि त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते. रखडलेले करार पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थी, शिक्षक, लेखक आणि मीडियाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला असतो. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळते.व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात.

advertisement
2/5
ज्योतिषशास्त्रात बुधाचा उदय खूप महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिष तज्ञांच्या मते, बुध हा व्यवसाय, व्यापार आणि वाणीचा कारक ग्रह मानला जातो. त्याला सर्व ग्रहांचा राजकुमार म्हणूनही ओळखलं जातं. बुध उदयानं त्याची सकारात्मक शक्ती अनेक राशींवर लक्षणीय परिणाम करते. हा काळ व्यवसाय, करिअर आणि शिक्षणाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम आणतो. तर, बुधाच्या उदयामुळे कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.

3/5
1. वृषभ - वृषभ राशीसाठी बुधाचा उदय सुवर्णसंधी घेऊन येईल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता असून भागीदारी फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना बढती आणि आदर मिळेल. तुमच्या संवाद कौशल्याने लोक प्रभावित होतील आणि याचा तुमच्या करिअरवर थेट परिणाम होईल.

4/5
2. सिंह - उदय पावणारा बुध ग्रह सिंह राशीसाठी विशेष लाभदायी असेल. या काळात तुमचं शहाणपण आणि निर्णयक्षमता वाढेल. करिअर आणि व्यवसायाला नवीन दिशा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर राहील.

5/5
3. तूळ - बुधाच्या उदयाने तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये लक्षणीय यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायांचा विस्तार होईल आणि नवीन करार मिळतील. प्रवास देखील फायदेशीर राहील. या काळात तुमचे नियोजन आणि कठोर परिश्रम उत्कृष्ट परिणाम देतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
3. तूळ - बुधाच्या उदयाने तूळ राशीच्या लोकांना करिअरमध्ये लक्षणीय यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायांचा विस्तार होईल आणि नवीन करार मिळतील. प्रवास देखील फायदेशीर राहील. या काळात तुमचे नियोजन आणि कठोर परिश्रम उत्कृष्ट परिणाम देतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement