चिकन मागितल्याने संताप अनावर, जन्मदातीने 7 वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला जीव
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पालघर जिल्ह्यातील धनसार येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या सात वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे.
राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर: पालघर जिल्ह्यातील धनसार येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या सात वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. सात वर्षीय मुलाने आपल्या आईकडे चिकनची मागणी केली होती. पण यानंतर संतापलेल्या आईने थेट मुलाचा जीवच घेतला. तिने चपाती लाटायच्या लाटण्याने मुलाला जबरी मारहाण केली. लाटणं डोक्यात लागल्याने मुलाचा करुण अंत झाला आहे. या प्रकरणी धनसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी ३८ वर्षीय महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनसार येथील एका घरात ही अमानुष घटना घडली. मुलाने आईकडे जेवणामध्ये चिकन बनवण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे संतप्त झालेल्या ३८ वर्षीय आईने चिमुकल्याच्या डोक्यावर लाटणीने जोरदार प्रहार केला.
हा घाव वर्मी लागल्याने चिमुकल्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
निर्दयी आईला अटक
या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी आईला तिच्या घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ चिकन मागितल्याच्या कारणातून आईनं अशाप्रकारे मुलाची हत्या केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
September 28, 2025 12:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चिकन मागितल्याने संताप अनावर, जन्मदातीने 7 वर्षांच्या चिमुकल्याचा घेतला जीव