BCCI New President : बीसीसीआयचे नवे बॉस Mithun Manhas कोण? राजीव शुक्ला यांनी जाहीर केली नावं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mithun Manhas BCCI New President : बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या निवडीची माहिती देताना सांगितले, मिथुन मन्हास यांची BCCI च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
BCCI New President : जम्मू-काश्मीर आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेले माजी क्रिकेटपटू आणि अनुभवी फलंदाज मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्विट करून मन्हास यांचं अभिनंदन केलं. मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर रविवारी ही घोषणा करण्यात आली. त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली.
अरुण ठाकूर IPL चेअरमनपदी
BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या निवडीची माहिती देताना सांगितले, मिथुन मन्हास यांची BCCI च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. माझी उपाध्यक्षपदी, देवजीत सैकिया यांची सचिवपदी, तर अरुण ठाकूर यांची IPL चेअरमनपदी निवड झाली आहे, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
#WATCH | Mumbai: BCCI vice president Rajeev Shukla says, "Mithun Manhas has become the new President of the BCCI. I have been elected as Vice President, Devajit Saikia-Secretary...Arun Thakur will be the IPL Chairman..."
On India vs Pakistan Asia Cup final today, he says, "We… pic.twitter.com/ulzdXtCDDx
— ANI (@ANI) September 28, 2025
advertisement
मिथुन मन्हास कोण आहेत?
मिथुन मन्हास यांनी 1997 मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ते देशांतर्गत क्रिकेटमधील एक अनुभवी आणि भरवशाचे बॅटर मानले जातात. 2007 मध्ये त्यांनी दिल्लीला रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्या हंगामात त्यांनी 57.56 च्या सरासरीने 921 धावा केल्या होत्या. 157 प्रथम श्रेणी मॅचमध्ये त्यांनी 27 शतक आणि 49 अर्धशतकांसह 9714 धावा केल्या.
advertisement
आयपीएलमध्ये प्रतिनिधित्व
मिथुन मन्हास यांनी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्सचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी कधीही भारतीय आंतरराष्ट्रीय टीममध्ये स्थान मिळवले नाही, कारण त्यांच्या काळात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारखे दिग्गज खेळाडू टीममध्ये होते.
#WATCH | Mumbai | On the new BCCI President, former Indian cricketer Harbhajan Singh says, "I congratulate the new BCCI team, including Mithun (Manhas) and all the members. What BCCI and Jay Shah have done for cricketers to make the sport grow is commendable. Every cricket lover… pic.twitter.com/knCub0WaWX
— ANI (@ANI) September 28, 2025
advertisement
संचालक म्हणूनही जबाबदारी
मिथुन मन्हास यांनी खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर कोचिंगमध्येही काम केले आहे. ते पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि गुजरात टायटन्ससाठी सहायक कोच म्हणून काम केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन (JKCA) मध्ये संचालक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे आणि बीसीसीआयच्या बैठकांमध्ये जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते बीसीसीआय अध्यक्षपदासाठी एक सर्वमान्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
BCCI New President : बीसीसीआयचे नवे बॉस Mithun Manhas कोण? राजीव शुक्ला यांनी जाहीर केली नावं