TRENDING:

आधी म्हणाले दीड वर्षात बंद होईल सिनेमा, महेश मांजरेकर आता स्वत:च करतायत 450 कोटींच्या पिक्चरची तयारी

Last Updated:

Mahesh Manjrekar : एका मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर यांनी दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल असं म्हटलं होतं. आता तेच महेश मांजरेकर 450 कोटी कमावणाऱ्या सिनेमाच्या तयारीत आहेत. 450 कोटींच्या सिनेमाबद्दल ते नेमकं काय म्हणाले पाहूयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने महेश मांजरेकर यांनी अनेक मुलाखती दिल्या. मराठी सिनेमा वर्ल्डवाइल्ड जावा, मराठी सिनेमानं 100 कोटी कमावण्यासाठी काय करावं लागेल याविषयी त्यांनी त्यांची अनेक मत मांडली. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना ते दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल असं म्हणाले होते. वाढत्या AI च्या वापरामुळे हे होईल असं ते म्हणाले होते. अशातच महेश मांजरेकर आता स्वत: 450 कोटी कमावणाऱ्या सिनेमाच्या तयारीत आहेत. नुकत्यात एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं.
News18
News18
advertisement

मी 450 कोटी कमावणारा मराठी सिनेमा बनवणारच असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 450 कोटींच्या सिनेमासाठी ते 100 कोटी देणारा निर्माता हातात टॉर्च घेऊन शोधत आहेत असं त्यांनी सांगितलं.

( 'प्रेतांवर उभी राहिलेली ती जागा', महेश मांजरेकर आजही 'त्या' ठिकाणी जात नाहीत, अजूनही उडतो थरकाप )

तारांगणला दिलेल्या मुलाखतीत बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, "ज्या दिवशी मराठी सिनेमा कात टाकेल आणि बजेटनुसार जरासा मोठा, चांगले विषय तर आपल्याकडे खूप आहेत. चांगला विषय घेऊन जेव्हा मोठ्या बजेटचा सिनेमा करेल. तुम्हाला जर 450 कोटी 600 कोटींमध्ये पोहोचायचं असेल तर तुम्हाला तो ऑल ओवर इंडिया आणि ऑल ओव्हर वर्ल्ड रिलीज करावा लागेल त्यामुळे कांतारा जर कन्नडमध्ये असता तर त्याने इतका बिझनेस केला नसता. कांतारा किंवा केजीएफ, केजीएफ 2 हे सिनेमे पॅन इंडिया होते म्हणून ते एवढं करू शकले तसा आपण एक सिनेमा काढायला हवा जो पॅन इंडिया आहे, सगळ्या भाषेत."

advertisement

महेश मांजरेकर पुढे म्हणाले, "उद्या जर मला या सिनेमाला घवघवीत यश मिळालं आणि त्यांनी मला सांगितलं की हिंदीत डब करा. शेतकऱ्यांचा विषय हा देशभरातील विषय आहे. माझा पंजाब, मध्यप्रदेश,केरळमधील शेतकरीही तेवढाच त्रासलेला आहे."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

"मी म्हटलं मी एक पिक्चर असा करेन जो 450 कोटी करेल आणि वाजेल. मी एक टॉर्च घेऊन एका प्रोड्युसरला शोधतोय. तो किमान 100 कोटीचा तरी पिक्चर पाहिजे. बाकी सगळ्यांची सोंग आणाल पण पैशांचं सोंग कसं आणाल. हे घे कर पिक्चर, एवढा विश्वास पाहिजे माझ्यावर, मग मी दाखवून देईन की आपण काय करू शकतो."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी म्हणाले दीड वर्षात बंद होईल सिनेमा, महेश मांजरेकर आता स्वत:च करतायत 450 कोटींच्या पिक्चरची तयारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल