'जुनं फर्निचर' या सिनेमाचा टिझर लाँच सोहळा शिवाजी पार्क येथे दणक्यात पार पडला. सलीम खान यांच्या हस्ते हे टिझर लाँच करण्यात आलं. यावेळी महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर या सिनेमातील कलाकारांसह अनेक स्थानिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यादरम्यान महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवादही साधला. हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एक हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे.
advertisement
( हेही वाचा - Prasad Oak : 'ऐका हो ऐका...' अखेर प्रसाद ओकनं पूर्ण केली हास्यजत्रेच्या टीमची 'ती' इच्छा; PHOTO व्हायरल )
"या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा" या टॅगलाईनवरून ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. त्यांचं हे वेगळेपण 'जुनं फर्निचर'मध्येही जाणवत आहे. हे कळतेय. टिझरमधील त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढवते. मुळात हा आपल्या आजुबाजुला घडणारा विषय आहे. हल्लीच्या तरुणाईला घरातील, घराबाहेरील वयस्क व्यक्ती म्हणजे 'ओल्ड फर्निचर' वाटतात. परंतु याच जुन्या फर्निचरचे महत्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. मल्टीस्टारर असलेला हा एका कौटुंबिक सिनेमा आहे.
सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, '' हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडिंगमध्ये आहेत. त्यापैकीच हा 'ओल्ड फर्निचर' म्हणजेच 'जुनं फर्निचर'. ज्येष्ठ नागरिकांना हल्ली 'जुनं फर्निचर' म्हणतात. परंतु हेच जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते, हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केला आहे. यात भावना दडलेल्या आहेत. चित्रपटगृहातून बाहेर पडताना 'जुनं फर्निचर'बद्दलचा दृष्टिकोन बदलावणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाची टीमही अतिशय दमदार आहे. काहींसोबत मी याआधीही काम केले आहे. निर्माते यतिन जाधवसोबतही यापूर्वी मी 'दे धक्का २' केला होता. त्यामुळे एकंदरच ही मस्त भट्टी जमून आली आहे.''