साईसमाधीवर पोस्टर ठेवून केली प्रार्थना
मांजरेकर आणि त्यांच्या टीमने शिर्डीच्या साईमंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चित्रपटाचे पोस्टर साईंच्या समाधीवर ठेवून, शेतकऱ्यांच्या या कहाणीला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी प्रार्थना केली.
advertisement
यापूर्वी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पण यावेळी मांजरेकर एका अधिक गंभीर आणि संवेदनशील विषयाला हात घालत आहेत.
केवळ मनोरंजन करणं हे चित्रपटाचं उद्दिष्ट नाही
"पुन्हा शिवाजीराजे भोसले" या चित्रपटाचे कथानक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाभोवती फिरते ते म्हणजे 'आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि हाल पाहून त्यांना काय वाटले असते?'
साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना बोलताना महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले की, "हा सिनेमा केवळ मनोरंजनासाठी नाही, तर महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे."
सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत शेतकऱ्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत आणि त्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा चित्रपट एक दर्पण म्हणून काम करेल, असा विश्वास मांजरेकर यांनी यावेळी व्यक्त केला.