TRENDING:

मलायका अरोरा वयाच्या 52 व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेमात! मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर स्पॉट, VIDEO

Last Updated:

Malaika Arora Spotted : मलायका अरोरा वयाच्या 52 व्या वर्षी 'मिस्ट्री मॅन'सोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. अभिनेत्रीनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्रीच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. मलायका अरोरा 1998 मध्ये अरबाज खानसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण काही वर्षांत त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि 2017 मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर मलायका लगेच एका वर्षात अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. मलायका आणि अर्जुन कपूर यांनी 2018 ते 2024 पर्यंत रिलेशनमध्ये होते. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा चांगल्याच रंगल्या. आता वयाच्या 52 व्या वर्षी मलायका तिसऱ्यांदा प्रेमात पडली असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे मलायका नुकतीच एका मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. मलायका आणि तिच्या मिस्ट्री मॅनचा एअरपोर्टवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे मिस्ट्री मॅन कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

advertisement

मलायका अरोरा व्हिडीओ व्हायरल (Malaika Arora Video)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा कॅज्युअल लुकमध्ये एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे. यावेळी तिच्यासोबत एक मास्क घातलेला व्यक्तीदेखील दिसला. या व्यक्तीचा चेहरा मास्कमुळे नीट दिसला नाही. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मात्र मिस्ट्री मॅनबद्दलच्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. नेटकरी या मिस्ट्री मॅनबद्दल तर्क लावत आहेत.

advertisement

मलायका अरोराचा एअरपोर्टवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही मंडळी अभिनेत्रीच्या लव्ह लाइफबद्दल भाष्य करत आहेत. तर काही जण हा तोच कॉन्सर्टवाला मुलगा असल्याचं म्हणत आहेत. कारण या कॉन्सर्टवाल्या मुलासोबत मलायका याआधीही स्पॉट झाली आहे. विशेष म्हणजे एअरपोर्टवरील व्हिडीओमध्ये या मिस्ट्री मॅनने मलायसोबत ट्विनिंगदेखील केलं आहे.

advertisement

कोण आहे हा मिस्ट्री मॅन?

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर मलायका अरोराने काही काळ एकटं राहणं पसंत केलं होतं. पण नुकतंच मुंबईत ग्रॅमी अवॉर्ड विजेता गायक एनरिक इग्लेसियसचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. यावेळी मलायका एका मुलासोबत स्पॉट झाली. रिपोर्टनुसार मलायकासोबत स्पॉट झालेली व्यक्ती ही डायमंड बिझनेसमन हर्ष मेहता आहे. मुंबईतील कॉन्सर्टदरम्यानही दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि आता नेटकरी दावा करू लागले आहेत की हा व्यक्ती मलायकाचा सध्याचा बॉयफ्रेंड आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दराची घसरगुंडी कायम, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव?
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
मलायका अरोरा वयाच्या 52 व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेमात! मिस्ट्री मॅनसोबत एअरपोर्टवर स्पॉट, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल