मका दराची घसरगुंडी कायम
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 36 हजार, 045 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 8 हजार 296 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 926 ते जास्तीत जास्त 2045 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 2 क्विंटल मक्यास 2500 ते 2700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात आता ते दिवस परत येणार, वारं फिरलं, हवामान खात्याकडून अलर्ट
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 87 हजार 816 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 61 हजार 056 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 288 ते 1592 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नाशिक मार्केटमध्ये आवक झालेल्या 1200 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2600 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीन आवकेत मोठी घट
राज्याच्या मार्केटमध्ये 39 हजार 912 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जलना मार्केटमध्ये 7 हजार, 669 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3950 ते 5023 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3600 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4083 ते 4950 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





