TRENDING:

Anil Arora Suicide: आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला का केला फोन? बायको घरी असताना लेकीशी बोलले शेवटचं

Last Updated:

अनिल अरोरा यांनी बुधवारी म्हणजेच आज सकाळी इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडाली असून अरोरा कुटुंबाला तर मोठा धक्काच बसला आहे. अशातच आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला फोन केल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. अनिल अरोरा यांनी बुधवारी म्हणजेच आज सकाळी इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडाली असून अरोरा कुटुंबाला तर मोठा धक्काच बसला आहे. अशातच आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला फोन केल्याचे समोर आले आहे.
आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला का केला फोन?
आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला का केला फोन?
advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी फोन करून अमृताला सांगितले की, 'जगण्याला कंटाळलो आहे'. ही माहिती समोर येताच आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बायको घरी असताना त्यांनी लेक अमृताला फोन केला होता.

Malaika Arora Father Death: मलायकाच्या सांत्वनासाठी पोहोचली खान फॅमिली, अशी होती अर्जून कपूरची रिअँक्शन, VIDEO

advertisement

दरम्यान, बुधवारी ही घटना घडण्याच्या एक दिवस आधी मलायका आणि अमृता मंगळवारी रात्री आपल्या आई-वडिलांकडे गेल्या होत्या. समोर आलेल्या फोटोंमध्ये अमृताने आपल्या श्वानाला बाळासारखे खांद्यावर झोपवल्याचे दिसत आहे. कारमधून उतरल्यानंतर तिने पापाराझींच्या कॅमेऱ्यांसाठी पोज देखील दिल्या होत्या. मात्र, मलायका काहीशी नाराज दिसत होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहतूक कोंडीतून होणार सुटका, पुणे पोलिसांची ट्रॅफिकक्युअर प्रणाली काय? Video
सर्व पहा

दरम्यान, मलायकाच्या वडिलांनी त्यांच्या वांद्रे येथील घराच्या इमारतीतून सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. वडिलांनी आत्महत्या केली तेव्हा मलायकाची आई घरीच होती. मलायकाची आई जॉयस पॉलीकार्प यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितलं, अनील अरोरा हे दररोज सकाळी बाल्कनीमध्ये पेपर वाचत बसायचे. ते दररोज बाल्कनीमध्ये चप्पल घालून खुर्चीत बसायचे आणि पेपर वाचायचे पण आज त्यांची चप्पल लिविंग रुममध्येच होती. जॉयस पॉलीकार्प त्यांना शोधण्यासाठी बाल्कनीच्या दिशेने गेले तेव्हा ते तिथे नव्हते. जॉयस पॉलीकार्प यांनी बाल्कनीतून खाली वाकून पाहिलं तेव्हा बिल्डिंगचा वॉचमन ओरडत होता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Anil Arora Suicide: आत्महत्येपूर्वी अनिल अरोरा यांनी अमृताला का केला फोन? बायको घरी असताना लेकीशी बोलले शेवटचं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल