advertisement

Malaika Arora Father Death: मलायकाच्या सांत्वनासाठी पोहोचली खान फॅमिली, अशी होती अर्जून कपूरची रिअँक्शन, VIDEO

Last Updated:

अभिनेत्री मलायका अरोरावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. अनिल अरोरा यांनी बुधवारी म्हणजेच आज सकाळी इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडाली आहे.

मलायकाच्या सांत्वनासाठी पोहोचली खान फॅमिली
मलायकाच्या सांत्वनासाठी पोहोचली खान फॅमिली
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली आहे. अनिल अरोरा यांनी बुधवारी म्हणजेच आज सकाळी इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. या घटनेने सध्या सगळीकडे खळबळ उडाली असून अरोरा कुटुंबाला तर मोठा धक्काच बसला आहे. अशातच मलायकाच्या या कठीण काळात साथ देण्यासाठी मित्र-परिवार आलेला पाहिला मिळत आहे. अशातच खान कुटुंबीय देखील मलायकाच्या वडिलांच्या घरी पोहोचले आहेत.
मलायका अरोराला या कठीण काळात साथ देण्यासाठी खान कुटुंबीय आलेले दिसले. मलायकाचा एक्स नवरा अरबाज खान यावेळी साथ देण्यासाठी धावून आला. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान, सोहेल खान देखील मलायकाच्या वडिलांना श्रद्धांजली द्यायला पोहोचले. यावेळी अर्जुन कपूरही होता. त्याने खान फॅमिलीला पाहुन हात जोडले. यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त केला असून याविषयी अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम देखील उपस्थित आहे. जेव्हा ही आत्महत्येची बातमी समोर आली तेव्हा मलायका मुंबईमध्ये नव्हती. ती पुण्यात होती. दुपारनंतर ती मुंबईत पोहोचली.
advertisement
advertisement
मलायका अरोरा पुण्यात असल्यामुळे सगळ्यात पहिले घटनास्थळी अरबाज खान पोहोचले. त्यानंतर बहीण अमृता अरोरा पोहोचली. सिनेसृष्टीतील अनेक लोक या दुःखद बातमीनंतर मलायकाच्या मुंबईतील घरी पोहोचले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Malaika Arora Father Death: मलायकाच्या सांत्वनासाठी पोहोचली खान फॅमिली, अशी होती अर्जून कपूरची रिअँक्शन, VIDEO
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement