खूप कंट्रोल केलं पण अखेर अश्रूंचा बांध फुटलाच, वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायकाचा पहिला VIDEO समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
malaika arora first video after father death : मलायका कामानिमित्तानं बाहेर गेली होती. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच मलायका घरी परतली आहे. तिचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांचं निधन झालं आहे. अनिल अरोरा यांनी राहत्या घराच्या इमारतीच्या बाल्कनीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येनंतर संपूर्ण अरोरा फॅमिलीला मोठा धक्का बसला आहे. मलायका कामानिमित्तानं बाहेर गेली होती. वडिलांच्या मृत्यूची माहिती मिळताच मलायका घरी परतली आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मलायका अरोरा पहिल्यांदा समोर आली आहे.
मलायका आरोरा आणि पापाराझींचं खूप छान बॉन्डिंग आहे. पापाराझींसमोर नेहमीच हसत खेळत येणारी मलायका आज पूर्णपणे डिप्रेस दिसली. तिनं पापाराझींसमोर दु:ख लपवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र शेवटी तिच्या अश्रूंचा बांध फुटलाच. मलायकाचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.
advertisement
वडिलांच्या आत्महत्येच्या आधीच्या रात्री मलायका वांद्रे येथे स्पॉट झाली होती. तेव्हा ती थोडी नाराज आणि उदास असल्याचं पाहायला मिळालं होतं. याच दरम्यान सकाळी तिच्या वडिलांच्या आत्महत्येची माहिती समोर आली.
advertisement
वडिलांच्या आत्महत्येची माहिती समोर येताच मलायका अरोरा वांद्रे येथील घरी पोहोचली. मलायकाने चेहऱ्यावर मास्क लावला होता. मलायका कारमधून उतरते आणि थेट इमारतीच्या दिशेने चालू लागते. मलायकानं स्वत:ला खूप कंट्रोल केलं पण इमारतीच्या गेटच्या आत शिरताच मलायकाच्या अश्रूंचा बांध फुटला. मलायका ढसाढसा रडत अश्रू पुसत नातेवाईकांबरोबर जाताना दिसली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 11, 2024 2:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
खूप कंट्रोल केलं पण अखेर अश्रूंचा बांध फुटलाच, वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायकाचा पहिला VIDEO समोर








