‘मना'चे श्लोक चित्रपटाचं शीर्षक धार्मिक भावना दुखावणारं आहे. ज्यामुळे आता सिनेमाविषयी मोठा निर्णय घेण्यात आलाय. हिंदू जनजागृती समिती, समस्त हिंदू आघाडी आणि काही इतर स्थानिक संघटनांनी चित्रपटावर बंदीची मागणी केली होती. त्यांनी महाराष्ट्रातील काही भागांत या चित्रपटाचे शो बंद पाडले. पुण्यात दोन ठिकाणी कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये गोंधळ घालून शो थांबवला. या घटनांनंतर आता स्वतः मृण्मयी देशपांडे पुढे आली आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर निवेदन जारी करत चित्रपटाचे प्रदर्शन सध्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
मृण्मयीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "नमस्कार ! 'मना'चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. Z MUSIC CO. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. भेटूयात!' असं या निवेदनात म्हटलं आहे".
यामुळे आता सगळ्यांचे लक्ष या नव्या नावाकडे लागले आहे. चित्रपटाच्या आशयात कोणताही बदल होणार नाही, पण नावात काय बदल केला जाणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी मृण्मयीला पाठिंबा दिला आहे.