गोवर्धन अनसारी यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक देखील त्यांच्या निधनाची बातमी ऐकून हळहळली. तिने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहून असरानी यांनी श्रद्धांजली वाहिली.
advertisement
मानसी नाईक हिनं पोस्ट लिहित म्हटलंय, "अजूनही विश्वास बसत नाही की दिग्गज असरानीजी आता आपल्या सोबत नाहीत. मला 'जीलो अपनी फिल्मी ख्वाहिशे' या चित्रपटात त्यांची भूमिका साकारण्याचा दुर्मिळ सन्मान मिळाला होता. हा चित्रपट दूरदर्शी दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई सर यांचा होता. ही संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद दादा."
मानसीने पुढे लिहिलंय, "एक महिला अभिनेत्री म्हणून असरानीजींची भुमिका साकारणं हे माझ्या प्रवासातील सर्वात आव्हानात्मक पण आत्म्याला भिडणारा अनुभव होता. त्यांचा कॉमिक टायमिंग, भावभावना आणि स्क्रीनवरील प्रेझेन्स हे सगळं केवळ अनुकरण करण्यासारखं नव्हतं तर ते जादूसारखं होतं. असरानीजी, हसवण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी आणि अमूल्य वारसा मागे ठेवण्यासाठी धन्यवाद. आपली कला-सौंदर्य सदैव जिवंत राहील."
या पोस्टसह मानसी नाईकने तिने 'जीलो अपनी फिल्मी ख्वाहिशे' या चित्रपटातील अनसारी यांच्या लुकमधील तिचे फोटो देखील शेअर केलेत. असरानी यांच्या निधनाने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.