काय म्हणाला मनोज बाजपेयी?
ह्यूमन्स ऑफ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाला,"अभिनयाबाबत जेवढा भ्रम केला जातो तेवढाच तो त्रासदासय आहे. यागोष्टीचं मला नवलदेखील वाटतं. पियुष मिश्रासारख्या अभिनेत्यांसाठी हे खूपच अममानजनक आहे. पियुष मिश्रा एक अभिनेता म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षांपासून ते अभिनयक्षेत्रात उत्तम काम करत आहेत.
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले,"माझ्यासाठी हे खूपच अपमानजनक आहे. या क्षेत्रासाठी मी माझं सर्वस्व दिलं आहे. त्यामुळे अचानक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा टॅग लाऊन मिरवणाऱ्यांची लाट आली आहे. एक सर्वोत्कृष्ट अभिनेता झाला की पुन्हा चार महिन्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किंवा नॅशनल क्रशचा टॅग लावणारा दुसरा अभिनेता तयारच असतो. त्यामुळे सगळचं बदलतं. आपण प्रेक्षकांसमोर काहीतरी उत्तम कलाकृती घेऊन आलो आहोत, असं वाटत असतानाच हे सर्वोत्कृष्ट अभिनेते समोर येतात आणि सगळं संपतं.
advertisement
रश्मिकावर साधना निशाणा
मनोज बाजपेयींच्या या विधानानंतर त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूड गाजवणाऱ्या रश्मिका मंदानावर निशाणा साधल्याचं चाहत्यांकडून म्हटलं जात आहे. रश्मिकाला अनेक दिवसांपासून 'नॅशनल क्रश'चा टॅग देण्यात आला आहे. रश्मिका मंदानाने नुकतचं परफ्यूम लॉन्च केला आहे. या परफ्यूमचे नाव क्रशमिका मिल्क असं ठेवण्यात आलं आहे.
मनोजच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या...
मनोज बाजपेयीचा 'जुगनुमा' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट 1980 च्या काळातील आहे. सिनेमात मनोजने देव नामक भूमिकेला न्याय दिला आहे. एक वेगळा विषय असणारा हा चित्रपट आहे.