'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटात आपल्या भक्तावर अन्याय करणारा एक कुकर्मी बाबा दाखवला आहे. आपल्या वासनेसाठी अल्पवयीन मुलीसोबत तो चुकीचं कृत्य करतो. त्यानंतर आपल्या अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देणाऱ्या वकीलांचा (मनोज बाजपेयी) हा कोर्टरूम ड्रामा आहे. हा वकील शेवटी धर्माच्या नावाखाली पाखंड पसरवणाऱ्या बाबाला तुरुंगात पाठवतो. प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा हा चित्रपट आहे.
advertisement
Marathi Actress : 'देवाला मनातला भाव महत्त्वाचा, कपडे नाही'; बिकीनी फोटोवरील कमेंटवर मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली
अपूर्व सिंह दिग्दर्शित 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटात मनोज बाजपेयी, अदिती सिंह अंद्रिजा, सूर्य मोहन कुलश्रेष्ठ हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. दीपक किंगरानी यांनी चित्रपटाची कथा आणि संवाद लिहिले आहेत.
'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटातून एक भयानक वास्तव मांडण्यात आलं आहे. 2023 मध्ये ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या सर्वोत्तम चित्रपटांत या चित्रपटाचा समावेश आहे. न्यायव्यवस्था, समाजव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि अंधभक्त अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात भाष्य करण्यात आलं आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम मुद्द्याला हात घालणारी आहे. चित्रपटातील क्लायमॅक्स हादरवून टाकणारे आहेत. आज वीकेंडला एक उत्तम 'कोर्ट रूम ड्रामा' पाहायचा असेल तर 'एक बंदा काफी है' नक्की पाहा. झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.