Marathi Actress : 'देवाला मनातला भाव महत्त्वाचा, कपडे नाही'; बिकीनी फोटोवरील कमेंटवर मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Marathi Actress on Trolling : मराठी अभिनेत्रीने नुकतच बिकीनी पोस्टवरील ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. देवासाठी मनातला भाव महत्त्वाचा, कपडे नाही, असं अभिनेत्री म्हणाली.
Marathi Actress : मराठी मनोरंजनष्टीतील अनेक अभिनेत्रींना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. या अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून कामासंदर्भातील अपडेट्स शेअर करण्यासोबत वैयक्तिक आयुष्यातील फोटो, व्हिडीओही शेअर करत असतात. चाहत्यांनाही अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स जाणून घ्यायला आवडतं. आपल्या कलाकृतींमध्ये साधाभोळ्या दिसणाऱ्या या अभिनेत्रींनी कधी बिकीनीमधले फोटो शेअर केले तर लगेचच त्यांना ट्रोल केलं जातं. त्यांच्या फोटोवर कसलाही विचार न करता चुकीच्या पद्धतीने कमेंट्स केल्या जातात. नुकतचं एका मराठी अभिनेत्रीने तिच्या बिकीनी फोटोवर ट्रोल केल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. देवासाठी मनातला भाव महत्त्वाचा, कपडे नाही, असं अभिनेत्री म्हणाली.
छोट्या पडद्यासह रुपेरी पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. आपले वेगवेगळ्या लुकमधले फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. बिकीनीमधले फोटो शेअर केल्यावर तिला प्रचंड ट्रोल केलं जातं. याबद्दल लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं मत मांडलं आहे. बिकीनी फोटोवरील ट्रोलिंगवर रुचिरा म्हणाली,"सोशल मीडियावर मी कृष्णाच्या मंदिरात गेल्यावर तिथले फोटो शेअर करते. तसेच मी बिचवर गेले तर तिथले बिकीनीमधले फोटोही शेअर करते. तर लोक का मिक्स का करत आहेत. दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यामुळे माझ्या इसकॉनमधल्या फोटोवर तुम्ही इसका बाकी का प्रोफाईल देखो, अशा कमेट्स करू शकत नाही".
advertisement
रुचिरा पुढे म्हणाली,"ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मी आहे. दोन्ही बाजू कशा सांभाळाच्या हे मला बरोबर माहिती आहे. कुठे काय घालायचं हे मला माहिती आहे. मी मंदिरात साडी किंवा ड्रेस घालून जाते. कधीकधी शूटिंग लवकर संपलं असेल तर मी नीट प्रेझेंटेबल कपडे घालून म्हणजे जीन्स-टॉपवर एक स्कार्फ गुंडाळूनही जाते. कारण देवाला माझा भाव महत्त्वाचा आहे. मंदिरात जाताना काय घालायचं आणि काय नाही घालायचं हे मला माहिती आहे. बिचवर काय घालायचं आणि काय नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे या दोन गोष्टी मिक्स करू नये".
advertisement
रुचिरा जाधवने 2016 मध्ये मराठी इंडस्ट्रीत 'तुझ्या वाचुन करमेना' या मालिकेच्या माध्यमातून पदार्पण केलं. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांत तिने काम केलं आहे. अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Marathi Actress : 'देवाला मनातला भाव महत्त्वाचा, कपडे नाही'; बिकीनी फोटोवरील कमेंटवर मराठी अभिनेत्री स्पष्टच म्हणाली