3 दिवसांत 200 कोटी! दिल्लीपर्यंत पोहोचली Kantara Chapter 1 ची हवा, थेट राष्ट्रपती भवनात होणार स्क्रीनिंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
कन्नड चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) या चित्रपटाने सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे.
मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) या चित्रपटाने सध्या संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच हा 'कांतारा १' प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आहे. तिकिटबारीवर जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या नावे आता एक अत्यंत मोठी आणि मानाची उपलब्धी जोडली गेली आहे.
देशाच्या सर्वोच्च स्थानी विशेष स्क्रीनिंग
चित्रपट जगतातील कोणत्याही कलाकृतीसाठी ही सर्वात मोठी सन्मानाची गोष्ट मानली जाते! 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाचेस्पेशल स्क्रीनिंग आज, ५ ऑक्टोबरला, थेट दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आले आहे.
या खास स्क्रीनिंगच्या वेळी चित्रपटाचा नायक ऋषभ शेट्टी आणि प्रमुख अभिनेत्री रुक्मिणी वसंत हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. व्यावसायिक स्तरावर प्रचंड यश मिळवलेल्या या चित्रपटासाठी राष्ट्रपती भवनात खास कार्यक्रम आयोजित करणे, हे निर्मात्यांसाठी आणि संपूर्ण टीमसाठी अतिशय अभिमानास्पद आहे.
advertisement
तीन दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार!
चित्रपटाने कमाईच्या बाबतीतही मोठे आकडे पार केले आहेत. २ ऑक्टोबरला जगभरात प्रदर्शित झालेल्या 'कांतारा चॅप्टर १' ने पहिल्या तीन दिवसांतच देशांतर्गत १६० कोटी रुपयांचा विक्रम मोडला आहे. याशिवाय, जगभरात चित्रपटाने २३० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. 'कांतारा'प्रमाणेच 'कांतारा चॅप्टर १' चीही कहाणी लोकांना खिळवून ठेवणारी असून, ऋषभ शेट्टीचा अभिनय पाहून प्रेक्षक त्याचे चाहते होत आहेत. ही धमाकेदार कामगिरी ऋषभ शेट्टीच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप खास आहे.
advertisement
राष्ट्रपती भवनातील विशेष स्क्रीनिंगमध्ये सहभागी झाल्यानंतर, ऋषभ शेट्टी दिल्लीत एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. यावेळी तो मीडियाच्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि 'कांतारा १' च्या यशाबद्दल सविस्तर चर्चा करेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
3 दिवसांत 200 कोटी! दिल्लीपर्यंत पोहोचली Kantara Chapter 1 ची हवा, थेट राष्ट्रपती भवनात होणार स्क्रीनिंग