Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह वाढला, बारशातील कार्यक्रमानंतर राज थेट मातोश्रीवर!

Last Updated:

Raj Thackeray Uddhav Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अचानकपणे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मागील तीन महिन्यात राज यांची ही मातोश्रीवरील दुसरी भेट आहे.

ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह वाढला, बारशातील कार्यक्रमानंतर राज थेट मातोश्रीवर!
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह वाढला, बारशातील कार्यक्रमानंतर राज थेट मातोश्रीवर!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज अचानकपणे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. मागील तीन महिन्यात राज यांची ही मातोश्रीवरील दुसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये मातोश्रीवरील पहिल्या मजल्यावर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली.

उद्धव ठाकरेंच्या आधी राज मातोश्रीवर

संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमातून राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या आधीच निघाले होते. तिथून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मातोश्रीवर ते पोहोचले. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे हे देखील मातोश्रीवर पोहोचले. यावेळी राज ठाकरेंसोबत पत्नी शर्मिला ठाकरे देखील होत्या. शर्मिला ठाकरे या अनेक वर्षांनी मातोश्रीवर दाखल झाल्या. या कौटुंबिक जवळीकीमुळे दोन्ही बंधूमधील वाद संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
advertisement

ठाकरे कुटुंबियांचा एकत्रित फोटो...

संजय राऊत यांच्या नातवाचा आज नामकरण सोहळा होता. या कार्यक्रमात राज ठाकरे हे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह पोहचले होते. तर, उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दाखल झाले. कार्यक्रमात उद्धव आणि राज यांच्यात काही वेळ चर्चाही झाली. बारशाच्या कार्यक्रमात ठाकरे कुटुंबीयांनी एकत्रित फोटोदेखील काढला. यावेळी राज ठाकरे यांच्या शेजारी आदित्य ठाकरे उभे राहिले होते.  
advertisement
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संजय राऊत व इतरांसोबतही संवाद साधला.

>> ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला

5 जुलै 2025
मराठी विजयी मेळावा
विजयी मेळाव्यानिमित्त
2 दशकानंतर ठाकरे बंधू एकत्र
27 जुलै 2025
मातोश्री
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त
राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर जाऊन शुभेच्छा दिल्या
27 ऑगस्ट 2025
शिवतीर्थ निवासस्थान
advertisement
गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब 'शिवतीर्थ'वर
ठाकरे कुटुंबाचं मनोमिलन
10 सप्टेंबर 2025
शिवतीर्थ निवासस्थान
उद्धव ठाकरे संजय राऊत, अनिल परबांसह राज ठाकरेंच्या भेटीला

इतर संबंधित बातमी:

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह वाढला, बारशातील कार्यक्रमानंतर राज थेट मातोश्रीवर!
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement