Numerology: पावणं-पै नातेवाईकांमध्ये याच जोडीची होते चर्चा! या दोन मूलांकाची जोडी छान जमते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: अंक ज्योतिषानुसार प्रत्येक व्यक्तीचा एक विशिष्ट मूलांक असतो. हा मूलांक व्यक्तीच्या जन्म तारखेतील अंकांची बेरीज करून काढला जातो. अनेकदा दोघा जोडीदारांमध्ये मूलांक आणि राशी यांच्यात जुळणारे गुणधर्म नसतात, ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि संबंध बिघडतात, कधी कधी घटस्फोटापर्यंत देखील प्रकरण जाते. म्हणूनच, कोणत्या मूलांकासाठी कोणता मूलांक असलेली व्यक्ती चांगला जीवनसाथी ठरू शकते, हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरते.
मूलांक 1 आणि 9 मधील संबंध - अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1 आणि मूलांक 9 यांच्यातील नातेसंबंध उत्कृष्ट, प्रेमपूर्ण आणि सुसंवादाने भरलेले असत. ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झालेला असतो, त्यांचा मूलांक 1 असतो. अंक ज्योतिषशास्त्रानुसार मूलांक 1 वर सूर्य ग्रहाचा प्रभाव असतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्यामुळे, जर एखाद्या व्यक्तीने लग्नापूर्वी स्वतःचा आणि आपल्या जोडीदाराचा मूलांक जाणून घेतला तर त्यांच्यातील नातेसंबंध कधीही त्रासदायक होणार नाहीत, घटस्फोटाची वेळ येणार नाही, असे मानले जाते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)