ना डायरेक्टर ना ॲक्टर, करण जोहरने आपल्या मुलांसाठी निवडलं भलतंच क्षेत्र; कारण वाचून बसेल झटका

Last Updated:
कलाकारांचे न संपणारे नखरे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा वाढता खर्च यावरून सुरू असलेल्या वादात आता प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने उडी घेतली असून, त्याने थेट आपल्या मुलांना काय बनवायचे, हे ठरवले आहे.
1/8
मुंबई: चित्रपट जगतात सध्या एका गोष्टीवरून मोठी चर्चा सुरू आहे - ती म्हणजे, कलाकारांचे न संपणारे नखरे आणि त्यांच्या सोबतच्या लोकांचा वाढता खर्च! यात आता प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने उडी घेतली असून, त्याने थेट आपल्या मुलांना काय बनवायचे, हे ठरवले आहे.

advertisement
2/8
कलाकारांच्या टीममुळे होणाऱ्या त्रासाला तो कंटाळला आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने कलाकारांच्या सोबत असलेल्या टीम्सच्या खर्चावर तीव्र मत व्यक्त केले.
कलाकारांच्या टीममुळे होणाऱ्या त्रासाला तो कंटाळला आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत करण जोहरने कलाकारांच्या सोबत असलेल्या टीम्सच्या खर्चावर तीव्र मत व्यक्त केले.
advertisement
3/8
करण म्हणाला, “मी तर माझ्या मुलांना, यश आणि रुहीला, हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट बनवणार आहे! कारण सध्या ते लोक बाकीच्या लोकांपेक्षा जास्त कमाई करत आहेत.” तो पुढे म्हणाला,
करण म्हणाला, “मी तर माझ्या मुलांना, यश आणि रुहीला, हेअर स्टायलिस्ट आणि मेकअप आर्टिस्ट बनवणार आहे! कारण सध्या ते लोक बाकीच्या लोकांपेक्षा जास्त कमाई करत आहेत.” तो पुढे म्हणाला, "एक जण हेअर स्टायलिस्ट तर दुसरा मेकअपची जबाबदारी घेईल. दोघांनाही फायदा होईल!"
advertisement
4/8
करणने आपली खरी समस्या सांगितली. तो म्हणाला,
करणने आपली खरी समस्या सांगितली. तो म्हणाला, "आम्ही व्यावसायिक लोक आहोत. जर आमचे चित्रपटाचं बजेट ठरलेलं असेल, तर कलाकारांनी जास्तीच्या लोकांचा खर्च स्वतःच्या खिशातून करायला हवा."
advertisement
5/8
तो स्पष्टपणे म्हणाला की,
तो स्पष्टपणे म्हणाला की, "जर तुम्ही एखाद्या खेळाडूवरचा चित्रपट करत असाल, जिथे तुमचे शरीर प्रत्येकवेळी पडद्यावर दाखवायचे असेल, तर मी त्यासाठी पैसे देईन. पण तुम्ही जर सामान्य कलाकार असाल, तर तुमचे काम चांगले दिसणे आहे. चांगले जेवण करायचे असेल, तर ते तुम्ही तुमच्यासाठी करता, त्यासाठी मी का पैसे देऊ?"
advertisement
6/8
करणने काही कलाकारांचे कौतुकही केले, जे आपले खर्च स्वतः उचलतात. त्याने कलाकारांना 'दिलदारपणा दाखवा' असा सल्ला दिला.
करणने काही कलाकारांचे कौतुकही केले, जे आपले खर्च स्वतः उचलतात. त्याने कलाकारांना 'दिलदारपणा दाखवा' असा सल्ला दिला.
advertisement
7/8
 "तुम्ही मोठी फी आणि फायदा घेत असाल, तर सोबतच्या ६ ते ८ लोकांचा प्रवास आणि इतर खर्च स्वतः करा. यात दिलदारपणा दाखवा," असे तो म्हणाला.
"तुम्ही मोठी फी आणि फायदा घेत असाल, तर सोबतच्या ६ ते ८ लोकांचा प्रवास आणि इतर खर्च स्वतः करा. यात दिलदारपणा दाखवा," असे तो म्हणाला.
advertisement
8/8
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या वाढलेल्या मागण्यांमुळे काही प्रोजेक्ट्समधून वगळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर करणचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणला तिच्या वाढलेल्या मागण्यांमुळे काही प्रोजेक्ट्समधून वगळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर करणचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement