Marathi Actress : 'देवमाणूस' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुखची फसवणूक झाली आहे. 'दहीहंडी 2025'च्या इव्हेंटसाठी सेलिब्रिटी मॅनेजर सुजित सरकाळे या व्यक्तिने अस्मिताला इव्हेंटच्या आधी ठरल्याप्रमाणे अर्धी रक्कम दिली. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुजितने अभिनेत्रीला उरलेले पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला. पण 2-3 दिवस होऊन देखील अभिनेत्रीच्या खात्यात ती रक्कम जमा झालीच नाही. अभिनेत्रीने पैसे का जमा झाले नाही याची चौकशी केली असता तिची फसवणूक झाल्याचे उघड झाले. तातडीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण अनेक दिवस झाले तरीही काहीच झालं नाही. त्या महाशयाने पोलिसांनाही गंडवल्याचं अभिनेत्रीचं म्हणनं आहे. सुजित सरकाळे असं त्या गृहस्थाच नाव असून आजवर त्याने अनेक कलाकारांना फसवलं असल्याचं देखील उघड झालं आहे.
advertisement
अस्मिता देशमुख आपल्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत म्हणाली,"नमस्कार. मी अस्मिता देशमुख. व्हिडीओ बनवण्याचं कारण एकच आहे की जेवढे काही सेलिब्रिटी आहेत, जेवढे रिल-स्टार्स आहेत. तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचं आहे. एक माहिती मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. मध्यंतरी मी दहिहंदीचा एक इव्हेंट केला होता. सुजित सरकाळे याने मला इव्हेंट दिला होता. माझ्यासह इतरही अनेक सेलिब्रिटी या इव्हेंटमध्ये होत्या. हा किस्सा माझ्याबाबतही नाही तर तुमच्याबाबतही घडू शकतो".
Mohanlal : एका वर्षात 34 चित्रपट, 5 वेळा नॅशनल अवॉर्ड; प्रेक्षकांची खर्दी खेचणारा मोहनलाल आहे तरी कोण?
अस्मिता पुढे म्हणतेय,"सुजित सरकाळेने मला अर्धे पैसे पाठवले आणि बाकीचे इव्हेंटदरम्यान देणार होता. ठरल्याप्रमाणे मी इव्हेंटला गेले. इव्हेंट झाल्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले. त्या स्क्रीनशॉटमध्ये पैसे आल्याचं दिसत असलं तरी माझ्या अकाऊंटला मात्र ते पैसे आलेच नव्हते. सर्वर डाऊन, बँक इश्यू अशी कारणं त्याने मला दिली. आठवडा गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत घडलाय. इतरांच्या बाबतही हे घडू शकतं. फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून हा स्कॅम होतोय. खूपदा मी व्यवस्थितपणे त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पोलीसांकडे तक्रार केली. त्यांनासुद्धा त्याने गंडावलं. मला कळकळीची विनंती करायची आहे की, कोणताही इव्हेंट करण्याआधी पूर्ण पैसे घ्या".
'देवमाणूस' मालिकेसह 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेतही अस्मिता मुख्य भूमिकेत होती. अल्पावधितच अस्मिता आपल्या सहज, सुंदर अभिनयाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली आहे.