Mohanlal : एका वर्षात 34 चित्रपट, 5 वेळा नॅशनल अवॉर्ड; प्रेक्षकांची खर्दी खेचणारा मोहनलाल आहे तरी कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2023' जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीतील आजवरच्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. पंतप्रताध नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Mohanlal : मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना प्रतिष्ठित 'दादासाहेब फाळके पुरस्कार 2023' जाहीर झाला आहे. 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 23 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. एखाद्या मल्याळम अभिनेत्याला पहिल्यांदाच 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टी, साऊथसह सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते मोहनलालवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 65 वर्षीय मोहनलाल गेल्या 45 वर्षांपासून मल्याळम चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडत आहेत. आजवर 400 पेक्षा अधिक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे. याआधी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
advertisement
मोहनलाल विष्णुनाथन नायर यांचा जन्म 21 मे 1960 मध्ये केरळमधील एलंथूरमध्ये झाला. त्यांचे वडील लॉ सेक्रेटरी होते. तिरुवनंतपुरम येथील गवर्नमेंट मॉडल बॉयल स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. पुढे महात्मा गांधी कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम केलं. मोहनलाल यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असताना एका नाटुकलीसाठी त्यांनी पहिल्यांदाच एका 90 वर्षीय महाताऱ्याची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.
advertisement
'असं' आहे मोहनलालचं फिल्मी करिअर
मोहनलालने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये ‘थिरनोत्तम’ या चित्रपटाच्या माध्यमातून केली होती. परंतु सेन्सॉरच्या अडचणीमुळे हा चित्रपट तब्बल 25 वर्षांनी प्रदर्शित झाला. मोहनलाल यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट 'मंजिल विरिंजा पूक्कल’ (1980) आहे. या चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
advertisement
यानंतर, 1986 मध्ये आलेल्या ‘राजविन्ते माकन’ या चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवले. आजपर्यंत त्यांनी 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आपल्या प्रत्येक भूमिकेद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजही त्याच्या चित्रपटांनासाठी थिएटरबाहेर प्रेक्षकांच्या रांगा लागलेल्या असतात.
सुपरहिट चित्रपट देणारा मोहनलाल
मोहनलालच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. त्याच्या हिट चित्रपटांमध्ये किरीदम, मणिचित्रताजु, दृश्यम, पुलिमुरुगन आणि 'L2:Empuraan'चा समावेश आहे. बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडण्यासह या चित्रपटाचं, कथानकाचं, मोहनलालच्या अभिनयाचंही तेवढंच कौतुक झालंय. मोहनलाल यांनी मल्याळम चित्रपटांसह तामिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेंतील चित्रपटांतही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. 'इरुवर','कंपनी' आणि 'जनता गॅरेज' सारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाचं आजही तेवढचं कौतुक होतं.
advertisement
एका वर्षात 34 चित्रपट
मोहनलालच्या करिअरमध्ये 1986 हे वर्ष खूप खास ठरलं आहे. 1986 मध्ये एका वर्षात मोहनलालचे तब्बल 34 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यावेळी मोहनलाल फक्त 26 वर्षांचा होता. या 34 चित्रपटांतील 25 चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले होते. दर 15 दिवसांनी अभिनेत्याचा एक चित्रपट प्रदर्शित होत होता. मल्याळम इंडस्ट्रीत मोहनलालचं मोठं नाव आहे.
advertisement
5 वेळा नेशनल अवॉर्ड
मोहनलाल यांनी केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हे, तर निर्माता, पार्श्वगायक, डिस्ट्रीब्युटर, दिग्दर्शक आणि उद्योजक म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांना पद्मश्री, पद्म भूषण तसेच पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मोहनलालची स्वतःची एक फिल्म कंपनी आहे, ज्याचे नाव प्रणवम कला आहे.
advertisement
मोहनलालची एकूण कमाई किती?
मोहनलालची एकूण कमाई 427.5 कोटींच्या आसपास आहे. चित्रपट, मालिका, ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायाच्या माध्यमातून मोहनलाल चांगलीच कमाई करतो. मल्याळम बिग बॉसदेखील मोहनलालने होस्ट केलं आहे. मोहनलालला आलिशान गाड्यांची प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे Rolls Royce, Porsche आणि Mercedes सारख्या गाड्या आहेत. तसेच महागड्या घड्याळांचीदेखील त्याला आवड आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Mohanlal : एका वर्षात 34 चित्रपट, 5 वेळा नॅशनल अवॉर्ड; प्रेक्षकांची खर्दी खेचणारा मोहनलाल आहे तरी कोण?